'या' लेस्बियनला प्रियंकासोबत ठेवायचेत संबध, आता प्रियंका काय करणार?

प्रियंकाने निक जोनससोबत लग्न केलं. सरोगसीच्या माध्यमातून तिने आईपण स्वीकारलं. 

Updated: Feb 26, 2022, 08:27 AM IST
'या' लेस्बियनला प्रियंकासोबत ठेवायचेत संबध, आता प्रियंका काय करणार?  title=

मुंबई : प्रियंका चोप्रा दररोज काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. प्रियंका नुकतीच आई झाली आहे. ती आता आपला संपूर्ण वेळ बाळाला देत आहे. प्रियंका सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. असं असताना आता वेगळाच विषय चर्चेत आला आहे. एका लेस्बियनने चक्क प्रियंकाला प्रपोझ केलं आहे. 

प्रियंकाने शेअर केला हा अनुभव 

 प्रियंका आपल्या लूक आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. प्रियंका फक्त आता देशी गर्ल राहिलेली नाही तर ती ग्लोबल झाली आहे. प्रियंका अनेक मुद्यांवर मोकळेपणाने बोलते. तसाच तिने हा मोकळेपणा एका अनुभवताबाबतही दाखवला आहे. 

प्रियंकाला लेस्बियन मुलीने चक्क प्रपोझ केलं आहे. याचा अनुभव प्रियंकाने स्वतः एका कार्यक्रमात सांगितला आहे. 

लेस्बियन मुलीने केलं प्रपोझ 

एका लेस्बियन मुलीने प्रियंकाला प्रपोझ केलं. त्या मुलीला प्रियंकासोबत संबंध ठेवायचे होते. त्याबाबत तिने प्रियंकाला सांगितलं देखील. पुढे प्रियंकाने जे केलं ते सगळ्यांनाच स्तब्ध करणार आहे. 

प्रियंकाने स्वतःला त्या मुलीपासून वाचण्यासाठी चक्क एक स्टोरी बनवली. प्रियंकाने आपण रिलेशनशिपमध्ये असून तिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं. 

प्रियंकाने सांगितल्यानुसार, एक नाइट क्लबमधील ही घटना आहे. त्या लेस्बियन मुलीला माहित नव्हतं की, प्रियंका तशी मुलगी नाही. 

प्रियंका आणि लेस्बियन मुलगी एकमेकांना सुरूवातीपासून ओळखत होते. पण प्रियंकाला देखील ती मुलगी लेस्बियन असल्याच माहित नव्हतं. 

प्रियंकाला लेस्बियन मुलीबद्दल काय वाटतं? 

तो क्षण आठवून प्रियंका चोप्रा हसली, तिने सांगितले की त्या मुलीला कसा नकार दिला? तिने सांगितले की, मी तिला सांगितले की मी तशी अजिबात नाही. माझा एक बॉयफ्रेंड आहे.  जरी त्या काळात माझा बॉयफ्रेंड नव्हता. पण मी फक्त मुलांनाच पसंत करते. असं मी स्पष्ट सांगितलं. 

याशिवाय प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'अमेझॉन स्टुडिओ'च्या आगामी 'शीला' चित्रपटात 'मां आनंद शीला'ची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रियंकाचा हा चित्रपट बॅरी लेव्हिन्सन दिग्दर्शित करणार आहे. प्रियंका 'शीला' चित्रपटात अभिनयासोबतच या चित्रपटाच्या निर्मितीसाठीही काम करत आहे.