साऊथचा चॉलकेट बॉय Vijay Deverakonda ईडीच्या जाळ्यात, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला....

Vijay Deverakonda ED interrogation : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता बॉलिवूडच्या वाटेवर आलेल्या अभिनेता विजय देवरकोंडा याच्या अडचणीत एकाएकी वाढ झाली आहे. 

Updated: Dec 1, 2022, 01:32 PM IST
साऊथचा चॉलकेट बॉय Vijay Deverakonda ईडीच्या जाळ्यात, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला....  title=
liger fame actor Vijay Deverakonda had to face ED interrogation amid money laundering case

Vijay Deverakonda ED interrogation : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता बॉलिवूडच्या वाटेवर आलेल्या अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) याच्या अडचणीत एकाएकी वाढ झाली आहे. साऊथचा सुपरस्टार असणारा हा अभिनेता आता मात्र त्याच्या कोणत्याही आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर (money laundering case) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे ईडीच्या जाळ्यात अडकला आहे. विजयचा हल्लीच प्रदर्शित झालेला 'लायगर' (Liger) चित्रपट फारशी उल्लेखनीय कामगिरी बजावू शकला नाही. पण, या चित्रपटानं त्याला संकटांच्या दरीत लोटलंय हे खरं. (liger fame actor Vijay Deverakonda had to face ED interrogation amid money laundering case)

हेसुद्धा वाचा : बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय अभिनेत्यावर 14 वर्षीय मुलीकडून #MeToo चे धक्कादायक आरोप, म्हणाली...

FEMA चे नियम तोडण्यासंबंधी विजयला ईडीनं समन्स बजावलं. चित्रपट निर्मीती आणि प्रसिद्धीसाठी काळा पैसा वापरला गेल्याचं म्हणत सध्या या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. खुद्द विजयलाही या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. PMLA च्या कलम 50 अंतर्गत विजयचा जबाब नोंदवण्यात आला. माध्यमांच्या हाती आलेल्या माहितीनुसार तब्बल 12 तास त्याची चौकशी करण्यात आली. 

विजयची प्रतिक्रिया... 

सदर प्रकरणी पहिली प्रतिक्रिया देत आपल्याला स्पष्टीकरण देण्यासाठी बोलवलं गेल्याचं म्हणत चौकशीवजा एकही प्रश्न विचारण्यात आला नसल्याचं तो म्हणाला. प्रसिद्धीसोबत अडचणी आणि दुष्परिणामही एकत्रच येतात असं म्हणत त्यानं या संपूर्ण प्रकरणावर काहीशी भावुक प्रतिक्रिया दिली. विजयला चौकशीसाठी बोलवणं हा फक्त चाहत्यांनाच एक धक्का नसून, खुद्द अभिनेत्यालाही यामुळं मानसिक त्रास झाल्याचं म्हटलं जात आहे. 

नेमका अडचणीचा मुद्दा काय? 

सूत्रांच्या माहितीनुसार ईडीकडे 'लायगर' चित्रपटात फॉरेन फंडिंगचा वापर करत खर्च करण्यात आला असल्याची तक्रार करण्यात आली होती. विजय देवरकोंडालाही यामुळंच 17 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी निर्माते आणि दिग्दर्शकांचीही चौकशी झाली. चौकशीनंतर ED नं मनी लाँन्ड्रींग प्रकरणात चित्रपटाशी संलग्न अनेक व्यक्तींच्या नावे तक्रार दाखल केली आहे. PMLA- Prevention of money laundering Act अंतर्गत हे एक गंभीर प्रकरण असल्याचं सांगण्यात येत आहे. 

चित्रपट बॉक्स ऑफिसवर Flop 

120 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चात साकारलेला हा चित्रपट अवघ्या 60.80 कोटी रुपयांचीच कमाई करु शकला. चित्रपटाचा बहुतांश भाग लास वेगासमध्ये चित्रीत करण्यात आला होता. दरम्यान सध्या ईडी या प्रकरणी सखोल तपास करत असून, यामध्ये आणखी काही धागेदोरे मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.