लवरात्रिचे मोशन पोस्टर आऊट...

सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्माच्या लवरात्रि सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले.

Updated: Jun 22, 2018, 03:46 PM IST
लवरात्रिचे मोशन पोस्टर आऊट... title=

मुंबई : सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्माच्या लवरात्रि सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. या सिनेमात आयुष शर्मासोबत वरीना हुसैन प्रमुख भूमिकेत आहे. दोघांचाही हा पहिलाच सिनेमा आहे. या नव्याकोऱ्या सिनेमाचे पोस्टर अतिशय कलरफुल आहे. या पोस्टरमध्ये शानदार लायटिंगचा प्रयोग करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये दोघेही कलरफुल स्कूटरवर बसले आहेत आणि मागे गुजराती गाणे सुरु आहे.

लवरात्रि हा सलमान खानचे होम प्रॉडक्शन 'SKF' च्या बॅनरखाली बनले आहे. सिनेमाचा टिझर सलमानने रेस-3 सिनेमासोबत प्रदर्शित केला. सलमान या सिनेमात स्वतः जातीने लक्ष घालत आहे. रिपोर्ट्सनुसार, नवरात्रीचा विचार करुन ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यासाठी सिनेमाचे निर्माते गरबाच्या काही हिट गाण्यांचे राईट्स खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अभिनेता आयुष शर्माने लवरात्रिचे मोशन पोस्टर ट्विटर हॅंडलवर पोस्ट केले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, लवरात्रि- प्रेमाचे सेलिब्रेशन, ५ ऑक्टोबरला सिनेमागृहात झगमगण्यासाठी येत आहे. यापूर्वी सिनेमासंबंधित गोष्टी आयुष सोशल मीडियावर पोस्ट करत होता.

या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला आहे. आयुष, वरिनाप्रमाणे अभिराजही या सिनेमातून डेब्यू करत आहे.