मुंबईतील भाड्याचं घर Madhuri Dixit ला लवकरच करावं लागेल रिकामं

दिग्गज अभिनेत्री असूनही माधुरीवर का आली भाड्याच्या, घरात राहण्याची वेळ... आता भाड्याचं घरही करावं लागेल रिकामं  

Updated: Oct 5, 2022, 01:30 PM IST
मुंबईतील भाड्याचं घर Madhuri Dixit ला लवकरच करावं लागेल रिकामं title=

मुंबई : सेलिब्रिटींच्या रॉयल आयुष्याबद्दल (Royal Lives of Celebrities) कायम चर्चा रंगत असतात. कलाकारांच्या आलिशान राहणीमानाचा कायमच चाहत्यांना हेवा वाटत असतो. यामागची कारणं अनेक असतात. कोणा सेलिब्रिटीचं घर, त्यांच्याकडे असणाऱ्या कार आणि इतरही अनके गोष्टी. सेलिब्रिटी म्हटलं की ओघाओघाने त्यांच्या राहत्या घराबाबतही प्रकर्षाने कुतूहल व्यक्त करण्यात येतं. सध्या अशाच एका कुतूहलपूर्ण प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. ज्या उत्तरामुळं अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. 

हा कुतूहलपूर्ण प्रश्न आहे, माधुरी दीक्षितच्या (madhuri dixit) घराबाबतचा. सूत्रांच्या माहितीनुसार माधुरी मुंबईत एका अतिशय आलिशान घरात राहते. पण आता माधुरीला हे घर रिकामं करावं लागणार आहे. कारण सध्या माधुरी ज्या घरात राहते ते भाड्याचं आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माधुरीने आता मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे.  (madhuri dixit family)

मिळालेल्या माहितीनुसार, माधुरीने नवरात्रीच्या मुहूर्तावर एक नवीन अपार्टमेंट खरेदी केलं आहे. मुंबईतील लोअर परेल भागातील या अपार्टमेंटसाठी अभिनेत्रीने तब्बल 48 कोटी रुपये मोजले आहेत.  (madhuri dixit nene)

या मालमत्तेची नोंदणी 28 सप्टेंबर 2022 रोजी झाली होती. 53व्या मजल्यावर असलेले हे अपार्टमेंट 5,384 चौरस फुटांचं आहे.  या अपार्टमेंटसोबतच माधुरीला सात कार पार्किंग स्लॉट देखील मिळाले आहेत.

माधुरी राहत असलेल्या घराचं भाडे (rent of the Madhuri house )
माधुरी मुंबईत एका अतिशय आलिशान घरात राहते. ज्या घराचं भाडं म्हणून तिला तब्बल 12.5 लाख रुपये इतकी रक्कम दर महिन्याला भरावी लागते.  मुंबईतील या घरात तीन वर्षांसाठी राहण्याचा करार करुन झाली आहे. वरळीतील इंडियाबुल्स ब्लूमध्ये (Indiabulls Blue) तिचं हे घर आहे. तिचं हे घर जवळपास 5500 चौरस फुटांचं आहे.