साई पल्लवी जन्मलीही नसेल तेव्हाची 'नो मेक-अप ब्युटी' होती 'ही' अभिनेत्री! मोठ्या पडद्यावरही नव्हती Pimples ची परवा

चेहऱ्यावर पिंपल, डाग असल्याने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री ते मेकअपच्या खाली लपवतात. पिंपल दिसल्याने अभिनेत्रीचं सौंदर्याला डाग लागतो असा काहीसा समज असतो. पण साई पल्लवीने सौंदर्याची परिभाषा बदलेली. ती नो मेक अप चित्रपटात अभिनय करते. पण तिचा जन्मही झाला नव्हता तेव्हा बॉलिवूडमधील ही अभिनेत्री नो मेक अप ब्युटी होती. 

नेहा चौधरी | Updated: May 15, 2024, 09:54 AM IST
साई पल्लवी जन्मलीही नसेल तेव्हाची 'नो मेक-अप ब्युटी' होती 'ही' अभिनेत्री! मोठ्या पडद्यावरही नव्हती Pimples ची परवा title=
Madhuri Dixit was no make up beauty when Sai Pallavi was not even born Pimples was not even on the big screen

आज बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड यातील अभिनेत्री या चित्रपटात नाही तर सर्वसाधारण आयुष्यातही बिना मेकअपमध्ये कधीही वावरत नाही. त्या बिना मेकअप कशा दिसतात हे चाहत्यांना माहिती नाही. जाड मेकअपच्या थराखाली अभिनेत्री आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आणि वृद्धीपणात येणाऱ्या सुरकुत्या लपवल्या जातात. अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चित्रपटाचा गल्ला असतो असं काहीसा समज हा सिनेसृष्टीत आहे. त्यामुळे मेकअप करुन अभिनेत्रीचं सौंदर्य अधिक खुलवलं जातं. 

पण साऊथ इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीने ही परिभाषा मोडून काढली आहे. साई पल्लवी ही मेकअप न करता चित्रपटात काम करते. तिचा विश्वास तिच्या अभिनयावर आहे. तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स असूनही ती कधीही मेकअपच्या खाली लपवत नाही. ती जशी आहे तिशी चित्रपटात काम करते. पिंपल्स असूनही साईच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहते घायाळ आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, साईचा जन्मही झाला नव्हता तेव्हा बॉलिवूडमधील ही अभिनेत्री बिना मेक चित्रपटात काम केलं होतं. 

आम्ही बोलत आहोत माधुरी दीक्षित हिचाबद्दल... तरुणपणात माधुरी हिच्या चेहऱ्यावरही पिंपल्स होते. नाना पाटेकर यांचा प्रहार या चित्रपटात माधुरी दीक्षित बिना मेकअप दिसली आहे. तिच्या जोडीला डिंपल कपाडियानेही मेकअप केलं नाही. त्यावेळी माधुरी दीक्षितने तिच्या चेहऱ्यावरील मुरुम दिसत असल्याची परवाही केली नाही. 

खरं तर महिलांमध्ये किशोरवयात, तारुण्यात आणि त्यानंतरही शारीरिक बदल, जसेकी, होर्मोनल इंबॅलन्स (hormonal imbalance), मानसिक तणाव (mental stress), आहारात काही पोषणतत्वांची कमी (nutritional deficiencies) अशा अनेक कारणांमुळे पिंपल्सची समस्या त्रासदायक ठरते. माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेने यांनी पिंपल्सबद्दल एक व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर केला आहे. त्या व्हिडीओला माधुरीने तिच्या अकाऊंटवर शेअर करताना लिहिलंय की, ''काश पिंपल्सबद्दलची ही संपूर्ण माहिती मला माझ्या किशोरवयात समजली असती.''

आज वयाच्या 57 व्या वर्षी माधुरी दीक्षित तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करताना दिसते. आजच्या तरुण अभिनेत्रीही माधुरीच्या सौंदर्यासमोर फिक्या ठरतात.