'संजय कपूरचे विवाहबाह्य संबंध होते, मला समजल्यानंतर...', महिप कपूरचा गौप्यस्फोट, 'गरजेपेक्षा जास्त...'

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरचे (Sanjay Kapoor) विवाहबाह्य संबंध होते. त्याची पत्नी महिप कपूरनेच (Maheep Kapoor) नेटफ्लिक्सवरील Bollywood Wives या वेब सीरिजमध्ये याचा खुलासा केला होता.   

शिवराज यादव | Updated: May 13, 2024, 06:12 PM IST
'संजय कपूरचे विवाहबाह्य संबंध होते, मला समजल्यानंतर...', महिप कपूरचा गौप्यस्फोट, 'गरजेपेक्षा जास्त...' title=

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची पत्नी महिप कपूरने नेटफ्लिक्सवरील Bollywood Wives या वेब सीरिजमधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या वेब सीरिजमध्ये तिने आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल जाहीर खुलासा केला होता. दरम्यान एका मुलाखतीत तिने आपण हा खुलासा नेमका का केला आणि त्यावर लोकांकडून काय प्रतिक्रिया आल्या याबद्दल सांगितलं आहे. 'झूम'शी संवाद साधताना महिप कपूरने सांगितलं की, "मला असं वाटतं की, लोकांना आपल्या साच्यातून बाहेर यायचं नसतं आणि दुसऱ्याच्या ठिकाणी स्वत:ला उभं करुन त्याची स्थिती समजून घेण्याची इच्छाही नसते. प्रत्येकाला थोडा वेळ द्या. प्रत्येकजण पूर्णपणे योग्य नसतो. प्रत्येकजण गरजेपेक्षा जास्त व्यक्त होत आहे. ठीक आहे, त्यात इतकं काही मोठं नाही".

महिप कपूरची खास मैत्रीण आणि अनन्या पांडेची आई भावना पांडेही यावेळी उपस्थित होती. भावना पांडेने यावर आपलं मत मांडत सांगितलं की, "मुळात तिला याच्यात काहीच समस्या नसून, हा तिचा निर्णय आहे. प्रत्येकाला आपल्याला जे योग्य वाटतं ते करावं लागतं". यानंतर पुढे महिपने सांगितलं की, "तुम्ही तुमचं मत व्यक्त करु शका, पण त्यात खोडसाळपणा करण्याची गरज नाही. माझीही मतं आहेत, पण मी त्याबद्दल खोडसाळ नाही. मुलांना आपले पालक आपल्यासाठी हजर आहेत याची जाणीव हवी. त्यांचा कम्पर्ट झोन असला पाहिजे आणि आपण सुरक्षित आहोत असं वाटलं पाहिजे". 

Fabulous Lives Of Bollywood Wives च्या दुसऱ्या सीझनमध्ये महिपने लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये संजय कपूरने आपली फसवणूक केल्याचा खुलासा केला होता. पण आपण त्यापलीकडे जाऊन पाहणं पसंत केलं आणि पतीशी समेट घडवली. आपली मैत्रीण सीमाशी बोलताना महिपने कबुली दिली की, "तुला तर माहिती आहे, लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये संजयला आणि माझ्यात जो काही अविवेकीपणा होता. मी शनायासोबत बाहेर पडले होते. मी स्वत: साठी उभी राहिली होते पण त्यावेळी माझ्या हातात नुकतंच जन्मलेलं बाळ होतं. एक स्त्री आणि एक आई म्हणून माझं मूल माझं प्राधान्य होतं. ती त्यांचीही मुलगी होती. तो एक चांगला बाप आहे. मी आज जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा जर मी तेव्हा साथ सोडली असती तर आयुष्यभर पश्चात्ताप झाला असेल. कारण जेव्हा माझी मुलं आणि पती घरात येतात तेव्हा हे त्यांचं आश्रयस्थान असतं. त्यांना शांतता मिळायला हवी. मला वाटतं की संजय मलाही ती शांतता देतो". 

महीप कपूरने तिच्या मैत्रिणी भावना पांडे, सीमा सजदेह आणि नीलम कोठारी यांच्यासमवेत Fabulous Lives Of Bollywood Wives या रिॲलिटी मालिकेच्या दोन सीझनमध्ये काम केलं आहे. तिची मुलगी शनाया मोहनलाल यांच्या 'वृषभा' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.