पुन्हा अनुभवता येणार तात्या विंचूचा थरार

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारा ‘झपाटलेला’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा ‘झपाटलेला’ सिनेमाची थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Updated: Nov 7, 2017, 12:09 PM IST
पुन्हा अनुभवता येणार तात्या विंचूचा थरार title=

मुंबई : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारा ‘झपाटलेला’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा ‘झपाटलेला’ सिनेमाची थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

कारण नुकतीच दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला ३’ सिनेमाची घोषणा केलीये. त्यामुळे तात्या विंचूला भेटण्याची प्रेक्षकांची उस्तुकता पुन्हा वाढणार आहे. 

महेश कोठारे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात नुकतीच 'झपाटलेला ३'ची घोषणा केली. 'झपाटलेला' चित्रपटाची लोकांमध्ये अजूनही प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळंच मी 'झपाटलेला ३' करायचं ठरवलंय,' असं त्यांनी सांगितलं.

काही महिन्यांपूर्वी कोठारे यांनी ट्विटरवर तात्या विंचूचा फोटो टाकत चाहत्यांना याचे संकेत दिले होते. त्यांच्या या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं होतं. आता कोठारेंनी 'झपाटलेला ३'ची अधिकृत घोषणा केलीय.

२०१३मध्ये महेश कोठारे 'झपाटलेला २' घेऊन आले होते. मराठीतील हा पहिला थ्री डी सिनेमा होता. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं त्यांनी 'झपाटलेला ३' घेऊन यायचं ठरवलं आहे. मात्र, यात मुख्य भूमिकेत कोण असेल, चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यात आहेत.