पाकिस्तानी अभिनेत्रीला या अभिनेत्याने जबरदस्तीने केला किस?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची गर्लफ्रेन्ड म्हणून चर्चेत असलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी एका न घेतलेल्या ‘किस’च्या वादात ती सापडली असून तिला ट्रोल केलं जातंय. 

Updated: Feb 22, 2018, 08:06 PM IST
पाकिस्तानी अभिनेत्रीला या अभिनेत्याने जबरदस्तीने केला किस? title=

कराची : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची गर्लफ्रेन्ड म्हणून चर्चेत असलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी एका न घेतलेल्या ‘किस’च्या वादात ती सापडली असून तिला ट्रोल केलं जातंय. 

नुकत्याच झालेल्या ‘लक्स स्टाईल अवॉर्ड २०१८’ मध्ये माहिरा खानला अवॉर्ड देण्यात आलं. हा अवॉर्ड तिला पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेते जावेद शेख आणि आणखी एका अभिनेत्रीच्या हस्ते देण्यात आला. यावेळी माहिराने स्टेजवर असलेल्या अभिनेत्रीची गळाभेट घेतली. ज्यावेळी ती जावेद शेख यांच्याकडे गेली तेव्हा शेख यांनी तिला बळजबरीने किस केल्याची चर्चा होत आहे. 

या ऑकवर्ड मोमेंटचा एक व्हिडिओही सोशल मीडियात गाजत आहे. पण दोन्ही कलाकारांनी या अफवांवर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी स्पोर्टींगली यावर प्रतिक्रियाही दिल्यात. 

माहिराने ट्विट केले की, 

जान-ए-मन, अपने, नमस्ते लंडन, ओम शांती ओम, युवराज, तमाशा आणि हॅपी भाग जाएगी यांसारख्या बॉलिवूड सिनेमात अभिनेते जावेद शेख यांनी काम केलं आहे. त्यांनीही यावर रिअ‍ॅक्शन दिली. ते दुबईला जात असताना त्यांनी एका मित्राच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केलाय.