VIDEO : 'पक्ष बदलत राहतील, पण हा देश टिकून राहिला पाहिजे'; 'मैं अटल हूं' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित

Mai Atal Hoon Trailer :  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित.

दिक्षा पाटील | Updated: Dec 21, 2023, 11:03 AM IST
VIDEO : 'पक्ष बदलत राहतील, पण हा देश टिकून राहिला पाहिजे'; 'मैं अटल हूं' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित title=
(Photo Credit : Social Media)

Mai Atal Hoon Trailer : लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर काल म्हणजेच 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या लूक आणि त्यांच्या स्वभावाची चर्चा सुरु आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढली आहे. 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या या चित्रपटांमध्ये पंकज त्रिपाठी यांनी त्यांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यांचे डायलॉग ऐकल्यावर वाटतं की खरंच अटल बिहारी वाजपेयी हे तिथे आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की कशा प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणात त्यांची जागा निर्माण केली आणि कशा प्रकारे त्यांनी देशाचा इतिहास बदलला. त्यासोबतच त्यांच्या लहाणपणातील दिवस, राजकारणातील करिअर, त्याचे दिवस कसे बदलले आणि त्यांनी भारताला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी समर्पण केलं हे सगळं त्यात दाखवण्यात आलं आहे. 

हेही वाचा : 'सगळ्यांनी मागे सरका'; भावाच्या बर्थ डे पार्टीत पापाराझींवर संतापला सलमान खान

ट्रेलर लॉन्चवेळी पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं की अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणं सोप नव्हतं. कारण त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत असताना त्यांची मिमिक्री करायची नव्हती आणि त्यांचं कॅरेक्टर जसं आहे तशी नक्कल करायची नव्हती. पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं की निर्माता संदीप सिंह यांनी आयपॅडवर वीएफएक्सच्या मदतीनं एक फोटो तयार केला ज्यात ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे दिसत होते. या चित्रपटासाठी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या संबंधीत जे काही पुस्तकं किंवा मटेरिअल होतं ते सगळं त्यांनी वाचलं. याशिवाय त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता वाचल्या आणि भाषणं ऐकली. आधीपासून त्यांना आवड असल्यानं त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी देखील अनेक गोष्टी वाचल्या होत्या. मात्र, चित्रपटासाठी त्यांनी आणखी अभ्यास केला, जेणेकरून ते त्यांची भूमिका ही पडद्यावर चांगल्या प्रकारे साकारू शकतील. 

भारताचे सगळ्यात लाडके आणि प्रिय राजकारणी श्री अटल बिहारी वाजपेयी हे शिक्षा, विज्ञान, पायाभूत सुविधा आणि जागतिक संबंध मजबूत करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल. पंकज त्रिपाठी यांनी त्यांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या पडद्यावर साकारली आहे.