मुख्य भूमिकेत असणाऱ्या नायकाचे वडील आजही चालवतात बस

'केजीएफ' सिनेमात मुख्य भूमिकेत असणाऱ्या नायकाचे वडील आजही बस चालवतात.

Updated: Jan 11, 2019, 06:42 PM IST
मुख्य भूमिकेत असणाऱ्या नायकाचे वडील आजही चालवतात बस title=

मुंबई: अभिनेता शाहरुखच्या 'झिरो' सिनेमाला मागे टाकत कन्नड सिनेमा 'केजीएफ' काही आठवड्यांतच २०० कोटींचा गल्ला जमा केला. 'केजीएफ' सिनेमात मुख्य भूमिकेत असणाऱ्या नायकाचे वडील आजही बस चालवतात. शाहरुख खानचा ‘झिरो’आणि दाक्षिणात्य अभिनेता यशचा 'केजीएफ' एकाच दिवशी प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य अभिनेता यशची मुख्य भूमिका अललेल्या 'केजीएफ' शाहरुखच्या 'झिरो' सिनेमाला मागे टाकले. आता प्रादेशिक सिनेमांचे कलाकारही बॉलिवूड कलाकारांना मागे टाकत आहेत. छोट्या पडद्यावरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या यशचे खरे नाव कुमार गौडा आहे.

Image result for kgf zee news

आजवर त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. यशचे बाबा अजूनही गावी बस चालवतात. अभिनेता यशच्या यशामागे त्याच्या वडीलांचा खारीचा वाटा आहे.बस ड्रायव्हर या कामामुळेच यशला त्याचे स्वप्न पूर्ण करता आले. मुलाच्या यशानंतर पैसा, प्रसिद्धी या सर्व गोष्टी त्याला मिळाल्या असल्यातरी त्यांनी बस ड्रायव्हरचे काम सोडलेले नाही.दक्षिणेतील सुपरस्टारमध्ये यशची गणना केली जाते.