सलमानशी प्रेम, लग्न कोणा दुसऱ्याशीच; भावूक होत अभिनेत्रीकडून इतक्या वर्षांनंतर मोठा खुलासा

या अभिनेत्रीनं करिअरची गाडी चांगली वेगात असतानाच लग्न करत कौटुंबीक जीवनाला प्राधान्य दिलं. 

Updated: Mar 2, 2022, 10:12 AM IST
सलमानशी प्रेम, लग्न कोणा दुसऱ्याशीच; भावूक होत अभिनेत्रीकडून इतक्या वर्षांनंतर मोठा खुलासा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सलमान खान याचं नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं. ज्या अभिनेत्रींशी त्यानं स्क्रीन शेअर केली त्यांच्यासोबतही असणारी त्याची केमिस्ट्री बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली. अशीच एक अभिनेत्री होती, जी सलमानसोबत झळकली, तिनं त्याच्याशी ऑनस्क्रीन रोमान्सही केला. (Salman khan)

या अभिनेत्रीनं करिअरची गाडी चांगली वेगात असतानाच लग्न करत कौटुंबीक जीवनाला प्राधान्य दिलं. 

ही अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. 'मैने प्यार किया' या चित्रपटातून भाग्यश्रीनं समलानसोबत स्क्रीन शेअर केली. ज्यानंतर तिनं 1990 मध्ये तिनं पालकांच्या विरोधात जात व्यावसायिक हिमालय दासानी याच्याशी लग्न केलं. 

सध्या भाग्यश्री आणि तिचे पती एका रिअॅलिटी शोचा भाग आहेत. इथं पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाचा घाट घातला गेला. ज्यावेळी या अभिनेत्रीनं भावूक होत तिच्या मनात साठलेल्या सर्व गोष्टींना वाट करुन दिली. 

'आईवडिलांची मुलांप्रती काही स्वप्न असतात. पण, मुलांचीही काही स्वप्न असतात, जी त्यांना जगू द्यावी कारण त्यांनाच त्यांचं आयुष्य जगायचं असतं...', असं भाग्यश्री म्हणाली. 

आपल्या लग्नामध्ये कुटुंबातून कोणीही हजेरी लावली नव्हती, असं म्हणत तिनं त्या प्रसंगांची आठवण काढली. पण, यावेळी भाग्यश्रीचे अश्रू थांबतच नव्हते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by StarPlus (@starplus)

आपण पळून लग्न केलं असं कोणीही व्यक्ती किंवा माध्यमं म्हणत असतील तर मी त्यांना सांगू इच्छिते की मी पळून लग्न केलं नव्हतं, ही बाब त्यांनी यावेळी मोठ्या धीरानं सर्वांसमोर मांडली.