सेल्फी काढण्याऱ्यांचा घोळक्यात सापडलेल्या मलायकाने काढला पळ

जेव्हा मलायकाला फॅन्सने अडवलं.

Updated: May 29, 2019, 07:32 PM IST
सेल्फी काढण्याऱ्यांचा घोळक्यात सापडलेल्या मलायकाने काढला पळ title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा हिचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिला पाहून फॅन्स इतके अतिउत्साहीत झाले की, मलायकाला कारमध्ये जाऊन बसावं लागलं. असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि लुकसाठी बऱ्याचदा चर्चेत असते. मलायका वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होते. 

पण आता या व्हिडिओमुळे मलायका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सेल्फी काढण्यासाठी तिच्या भोवती गर्दी झाल्याने मलायका या फॅन्सच्या गर्दीत सापडली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मलायका मॉलमध्ये तिच्या वडिलांसोबत शॉपिंग करायला गेली होती. मॉलमध्ये मलायकाला पाहताचा तिच्या फॅन्सने गर्दी केली. मलायकाबरोबर सेल्फी टिपायला चढाओढ सुरु झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#selfiee hunters are everywhere #malaikaarora with dad snapped today at a store.love the way she sneaks out

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

फॅन्सचा वाढता घोळका पाहता मलायका ही घाबरली आणि त्यानंतर लगेच तिने तिथून पळ काढला आणि कारमध्ये जावून बसली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशातील अनेक फॅन्सने महिला सेलिब्रिटींच्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बी-टाऊनमध्ये आपल्या रिलेशनमुळे सध्या चर्चेत आहेत. दोघांचं नातं आता जगजाहीर आहे आणि त्यांनी ही आपल्या रिलेशनशिपला लपवून ठेवलेलं नाही. त्यामुळे हे कपल आता लग्न कधी करणार याबाबतची उत्सुकता दोघांच्या चाहत्यांमध्ये आहे.

अर्जुन कपूरला प्रत्येक मुलाखतीत मलायका अरोरा विषयी प्रश्न विचारले जातात. अर्जुन कपूर देखील यावर मजेदार उत्तर देतो. तो म्हणतो की, सध्या लग्नाचा विचार नाही. मी माझ्या नात्यासह माझ्या कामातली खूश आहे. पण मी कोणालाही शॉक देणार नाही. मीडियाला सांगूनच मी लग्न करेल.'