'संजू' सिनेमात मनीषा कोईराला नर्गिसच्या भूमिकेत

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटाचं पुढील पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 

Updated: Jun 6, 2018, 02:58 PM IST
'संजू' सिनेमात मनीषा कोईराला नर्गिसच्या भूमिकेत  title=

मुंबई : राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटाचं पुढील पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात संजय दत्तची प्रमुख भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारत आहे. संजू चित्रपटासाठी रणबीर कपूरने घेतलेली मेहनत आणि सिनेमाच्या ट्रेलरलाही चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 

संजू चित्रपटाचं नवं पोस्टर 

संजू चित्रपटामध्ये नर्गीस दत्तची भूमिका अभिनेत्री मनीषा कोईरालाने साकारली आहे. मनीषा कोईराला पोस्टरवर हुबेहुब नर्गिस दत्तप्रमाणे दिसत आहे. नव्या पोस्टरमध्ये नर्गिसच्या भूमिकेतील मनीषा कोईराला मागे संजय दत्त म्हणजेच रणबीर कपूर आहे. 

 

चाहत्यांमध्ये उत्सुकता 

संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. त्यामुळे त्याचा उलगडा या सिनेमातून होणार का? याकडे लक्ष लागले आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर असलेल्या या चित्रपटामध्ये परेश रावल सुनील दत्तची भूमिका साकारणार आहेत. तर सोनम कपूर 'टीना मुनीम', दिया मिर्जा 'मान्यता दत्त', अनुष्का शर्मा वकीलाच्या भूमिकेत आहे.