'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांच्या निधनाविषयी सांगितलं. 

दिक्षा पाटील | Updated: May 13, 2024, 01:02 PM IST
'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी title=
(Photo Credit : Social Media)

Manoj Bajpayee : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ होते. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचे 6 महिन्याच्या अंतरात निधन झालं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी कशा प्रकारे वडिलांना देहाचा त्याग करण्यास सांगितलं. हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा मनोज वाजपेयी हे ‘किलर सूप’ या सीरिजची शूटिंग करत होते.

'सिद्धार्थ कन्नन'सोबत बोलताना मनोज वाजपेयी यांनी सांगितलं की "माझे वडील आणि मी खूप क्लोज होतो आणि त्यांच्यावर खूप प्रेम करायचो. मी भाग्यशाली आहे की माझा भाऊ आणि बहिणी त्यांची काळजी घेण्यासाठी तिथे उपस्थित होते कारण त्यावेळी मी केरळमध्ये किरल सूपचं शूटिंग करत होतो. मी नेहमी वडिलांना सांगून जायचो की मी शूटिंगसाठी जातोय आणि ते संपवून येईनं."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मनोज वाजपेयी यांनी सांगितलं की 'त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाला जितक्या चांगल्या प्रकारे सामोरे गेले, तसं ते 10 वर्ष आधी करु शकत नव्हते. त्यांनी सांगितलं की एक दिवस माझ्या बहिणीचा फोन आला आणि तिनं सांगितलं की वडिलांची शेवटची वेळ जवळ आली आहे आणि डॉक्टरांनी देखील यावर उत्तर दिलं, पण आताही मोह-मायाच्या जाळ्यात त्यांची आत्मा ही अडकली आहे. फक्त तुझ्यासोबतच त्यांचे असे संबंध राहिले आहेत की जर तुम्ही सांगितलं तर ते देहाचा त्याग करतील.' 

मनोज वाजपेयी पुढे म्हणाले की,"मी किलर सूपचा शॉट देण्यासाठी जात होतो. माझा स्पॉट बॉय देखील तिथे उपस्थित होता आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा, तुम्ही जा. बाबा झालं. कृपया तुम्ही जा... आणि तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. हे ऐकल्यानंतर माझा स्पॉट बॉय रडू लागला. असिस्टंट डायरेक्टर बाहेर उभे होते. त्यांना या विषयी माहित नव्हतं की इथे मी माझ्या वडिलांना देह त्याग करण्यास सांगत आहे. ते माझ्यासाठी खूप कठीण होतं, पण मी केलं. फक्त मला पाहण्यासाठी त्यांची आत्मा शरीरात होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जेव्हा भावानं कॉल केला तेव्हा त्यानं सांगितलं की बाबा आता या जगात राहिले नाही. तेव्हा मनोज हे खूप रडले." 

हेही वाचा : 'मी प्रीति झिंटाच्या बॉयफ्रेंडला हिसकावलं नाही...', अनेक दशकांनंतर 'या' अभिनेत्रीचा खुलासा

मनोज वाजपेयी यांनी सांगितलं की "त्यांचे वडील हे एक चांगले व्यक्ती होते. त्यांनी सांगितलं की आज आपण फेमिनिज्मविषयी बोलतोय, टॉक्सिक वागणूकीविषयी बोलतोय, पम मी त्यांना माझ्या आईशी मोठ्या आवाजानं बोलताना नाही पाहिलं. त्यांनी नेहमीच कुटुंबाला पाठिंबा दिला. वडिलांच्या निधनाच्या 6 महिन्यांनंतर माझ्या आईचे निधन झाले."