'आई की बाबा, लेक जिजा कोणासोबत जास्त असते?' आदिनाथ कोठारेने केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांच्या मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेल्या चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उर्मिला कुठेही दिसली नाही. 

Updated: Jan 17, 2024, 10:38 PM IST
'आई की बाबा, लेक जिजा कोणासोबत जास्त असते?' आदिनाथ कोठारेने केला खुलासा title=

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे लोकप्रिय कपलपैकी एक म्हणून ओळखले जातात. मराठी सिनेसृष्टीत कायमच चर्चेत राहणारी जोडी म्हणून ते चर्चेत असतात. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात.  ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’ असलेल्या त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे उर्मिला ही कोठारे कुटुंबातून विभक्त राहत असल्याची चर्चाही सुरु आहे. आता आदिनाथने त्याची लेक जिजा कोणाबरोबर राहते याचा खुलासा केला आहे. 

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्या दोघांना एक मुलगी असून तिचं नाव जिजा असं आहे. नुकतंच आदिनाथने झी 24 तासला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने जिजा आणि त्याचं नातं कसं आहे? याचा खुलासा केला. तसेच ती जास्त कोणाकडे असते, याबद्दलही त्याने सांगितले. 

"जिजा अगदी माझ्यासारखीच"

यावेळी आदिनाथ म्हणाला, "जिजा ही अगदी माझ्यासारखी आहे. ती अगदी शीतप्रज्ञ आहे. ती जिथे असेल तिथे ती आनंदात असते. जिजाला सर्वात जवळ आई आहे. पण आमचं नातं खूप गंमतीशीर आहे. ती जेव्हा आईसोबत असते तेव्हा ती आई, आई असं करत असते. तिची आई तिला भरवते. तिचे लाड करते."

"पण जेव्हा ती डॅडा बरोबर असते, आम्ही जर दोघं कुठे फिरायला गेलो तर ती एका समजुतदार मोठ्या मुलीप्रमाणे वागते. कारण तिला माहिती असतं की डॅडा हे सर्व काही करणार नाही. पण मी त्या गोष्टीही करतो. ती माझ्याबरोबर असताना एखाद्या समजंस मुलीसारखी असते. ती स्वत:हून सर्व गोष्टी करते. आम्ही मध्यंतरी फिरायला गेलो होतो, तेव्हा ती हॉटेलमध्ये स्वत:च्या हाताने जेवत होती. ती फक्त पाच वर्षांची आहे. माझं जिजासोबत एका छान मित्रासारखं नातं आहे आणि मला तसंच ते आयुष्यभर ठेवायचं आहे", अशी इच्छा आदित्यने व्यक्त केली. 

आदिनाथ आणि उर्मिला यांच्यात मतभेद?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांच्या मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेल्या चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उर्मिला कुठेही दिसली नाही. तसेच तिने यासंदर्भात एकही पोस्ट शेअर केलेली नव्हती. तर काही दिवसांपूर्वी उर्मिलाचा वाढदिवस झाला. त्यावेळीही त्याने तिच्यासाठी काहीही पोस्ट शेअर केली नव्हती. तसेच तब्बल १२ वर्षांनी उर्मिलाही छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसत आहे. सध्या तिच्या ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 

मात्र तिनं कमबॅक करण्यासाठी ‘कोठारे’ व्हिजन या आपल्या होम प्रॉडक्शनची नाही तर दुसऱ्या प्रॉडक्शनची निवड केली. या सर्व घटनांनतरच या चर्चांना उधाण आले. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. उर्मिला आणि आदिनाथ या दोघांना १८ जानेवारी २०१८ ला कन्यारत्न प्राप्त झाले.आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. त्यांच्या मुलीचे नाव जिजा असं ठेवलं.