'सरकार दरबारी जेव्हा...', राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल

त्याच्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे. 

Updated: Jan 27, 2024, 09:04 PM IST
'सरकार दरबारी जेव्हा...', राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल title=

Harish Dudhade Invite Maharashtra governor : छोट्या पडद्यावरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेता हरीश दुधाडेने पोलीस अधिकारी विजय भोसले ही भूमिका साकारली आहे. हरीशची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. हरीशच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे. 

हरीश दुधाडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने राज्यपाल रमेश बैस यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत हरीश दुधाडे हा राज्यपाल रमेश बैस यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने हटके कॅप्शनही दिले आहे. 

हरीश दुधाडेची पोस्ट 

26 जानेवरी २०२४, अविस्मरणीय दिवस. एक कलाकार म्हणून आम्हाला विविध प्रकारे कामाची पावती मिळत असते पण सरकार दरबारी जेव्हा ती नोंद घेतली जाते तेव्हा तो दिवस अविस्मरणीय ठरतो. माननीय गवर्नर "श्री . रमेशजी बैस " यांच्या निवासस्थानी आज मला आमंत्रित केले गेले. आजवर केलेल्या अनेक भूमिकांपैकी "विजय भोसले " ही भूमिका याचे मुख्य कारण ठरली.

आपलं काम कोण कधी कुठे पहात असतं काही सांगता येत नाही . या गोष्टीवर आज खऱ्या अर्थाने विश्वास बसला . माझ्या कामाचं कौतुक केलं सन्मान केला. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद असेच कायम राहू द्या., असे हरीश दुधाडेने म्हटले आहे. 

हरीशच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता अंकित मोहनने "बहिर्जी आम्हाला तुझा अभिमान वाटतो", अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर सुव्रत जोशीने "हऱ्या" असे म्हणत हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केला आहे. त्यासोबतच मुग्धा गोडबोलेने हार्ट इमोजी पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान हरीश दुधाडेला 'फत्तेशिकस्त', 'फर्जंद', 'पावनखिंड' या ऐतिहासिक चित्रपटांमुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने बहिर्जी नाईक ही भूमिका साकारली होती. त्याबरोबरच हरीश दुधाडे हा 'नकळत सारे घडले', 'तू सौभाग्यवती', 'सरस्वती', 'माझे मन तुझे झाले', 'तुमची मुलगी काय करते' या मालिकांमध्येही झळकला आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करत अभिनयाचा ठसा उमटवला.