'नवीन वर्षाची सुरुवात इतक्या...', 'पंचक' चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची पोस्ट; माधुरी दीक्षित म्हणाली...

Subodh Bhave Panchak Movie Post : गेल्या काही दिवसांपासून 'पंचक' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता आनंद इंगळे, अभिनेत्री आरती वडगबाळकर, अभिनेत्री दीप्ती देवी हे कलाकार झळकणार आहेत. 

Updated: Jan 4, 2024, 09:50 PM IST
'नवीन वर्षाची सुरुवात इतक्या...', 'पंचक' चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची पोस्ट; माधुरी दीक्षित म्हणाली... title=

Subodh Bhave Panchak Movie Post : बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा चित्रपट शुक्रवारी ५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे कोकणातील खोत कुटुंबाची गोष्ट उलगडणार आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेता सुबोध भावेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून 'पंचक' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता आनंद इंगळे, अभिनेत्री आरती वडगबाळकर, अभिनेत्री दीप्ती देवी हे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

नुकतंच 'पंचक' या चित्रपटाचा प्रीमिअर शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. आता अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत याबद्दल भाष्य केले आहे. 

"काल " पंचक " पाहिला. उपहासात्मक शैलीमध्ये सादर झालेला हा सुंदर चित्रपट. नवीन वर्षाची सुरुवात इतक्या छान चित्रपटाने करून दिल्याबद्दल संपूर्ण संघाचे मनापासून आभार. चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद घ्या", असे सुबोध भावेने म्हटले आहे. 

दरम्यान सुबोधच्या या पोस्टवर अभिनेत्री माधुरी दीक्षितने कमेंट केली आहे. तिने हार्ट आणि आभार मानतानाचा इमोजी पोस्ट करत यावर कमेंट केली आहे. तसेच अभिनेता आदिनाथ कोठारेने प्रतिक्रिया दिली आहे. आदिनाथ कोठारेने हार्ट इमोजी पोस्ट करत यावर कमेंट केली आहे. तर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने हार्ट इमोजी शेअर केला आहे.