‘पुन्हा कर्तव्य आहे’मधील चिनूचे 'या' अभिनेत्रीशी आहे खास कनेक्शन, 'रॅडी' म्हणून देते लाडाने आवाज

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रिण देविका हे पात्र साकारले होते.

नम्रता पाटील | Updated: Apr 15, 2024, 12:57 PM IST
‘पुन्हा कर्तव्य आहे’मधील चिनूचे 'या' अभिनेत्रीशी आहे खास कनेक्शन, 'रॅडी' म्हणून देते लाडाने आवाज title=

Punha Kartavya Aahe Chinu Connection With Radhika Deshpande : मराठमोळी राधिका देशपांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत राधिकाने अरुंधतीची मैत्रिण देविका हे पात्र साकारले होते. सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. त्यासोबत सध्या राधिका ही बालकलाकारांसाठी वर्कशॉप घेत आहे. आता सध्या राधिका एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. 

राधिका ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायमच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने आता इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या वर्कशॉपमध्ये शिकलेली बालकलाकार रुहू राहुल जावीर दिसत आहे. या व्हिडीओत रुही ही राधिका क्रिएशन्सबद्दल सांगताना दिसत आहे. 

रुही व्हिडीओत काय म्हणाली?

"नमस्कार, मी रुही राहुल जावीर मला राधिका क्रिएशन्सबद्दल थोडसं बोलायचं आहे. आता सध्या तुम्ही मला झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत पाहत आहात. मी या मालिकेत 'चिनू' हे पात्र साकारत आहे. पण या सगळ्याची सुरुवात कुठून झालीय माहितेय का? आपल्या 'राधिका क्रिएशन्सपासून'... मी जेव्हा साडेतीन वर्षांची होते, तेव्हा मी राधिका क्रिएशन्स जॉईन केले. त्यानंतर मी 3 नाटकात आणि 2 चित्रपटात काम केले. यातील एक 'ताराराणी', 'कर्मयोगी आबासाहेब'. त्यानंतर मग मी झी मराठीच्या 'ड्रामेबाज'च्या प्रोमोमध्ये आली. पण माझ्यातील खरा ड्रामेबाज बाहेर आणला तो 'रॅडी'नी. ती नुसती गुरु नाही. ती आमची बेस्ट फ्रेंडही आहे. थँक्यू राधिका क्रिएशन्स", असे रुही या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. 

राधिकासोबत आहे खास कनेक्शन

या व्हिडीओला कॅप्शन देताना राधिकाने रुहीचे कौतुक केले आहे. ही चिमुरडी माझी विद्यार्थिनी आहे. काल बालनाट्य बघायला आली आणि मला मिठी मारत म्हणाली "मी तुला खूप मिस करते रॅडी". हा व्हिडिओ तिने आपणहून पाठवला आहे. तिच्या आईला ती म्हणाली, “मला एक व्हिडिओ रॅडी साठी करायचा आहे जसा प्रोमो व्हिडिओ मी करते तसा” रुही! तू फार गोड आहेस. अनेक उत्तम आशीर्वाद, असे राधिकाने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान राधिका देशपांडे ही गेल्या कित्येक वर्षांपासून राधिका क्रिएशन्स नावाने वर्कशॉप घेते. यात अनेक बालकलाकारांना ती अभिनयाचे धडे गिरवायला शिकवते. रुहीदेखील राधिका क्रिएशन्सची एक विद्यार्थिनी आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत ती चिनू हे पात्र साकारताना दिसत आहे. तिच्या पात्राने सर्वच चाहत्यांना भुरळ घातली आहे.