चाहतीने केला नावाचा चुकीचा उल्लेख, विशाखा सुभेदार म्हणाली...

यावेळी एका चाहत्याने तिच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. यावर विशाखाने फारच हटके प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Mar 21, 2024, 05:56 PM IST
चाहतीने केला नावाचा चुकीचा उल्लेख, विशाखा सुभेदार म्हणाली... title=

Vishakha Subhedar Fan Comment : सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीचा 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री विशाखा सुभेदारला 'सर्वोत्कृष्ट खलनायिका' या श्रेणीत पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. पण यावेळी एका चाहत्याने तिच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. यावर विशाखाने फारच हटके प्रतिक्रिया दिली आहे. 

विशाखा सुभेदार ही सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत झळकत आहे. यात ती रागिणी या खलनायिकेचे पात्र साकारत आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' सोहळ्यात तिला 'सर्वोत्कृष्ट खलनायिका' पुरस्काराने गौरवण्यात आले. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. 

विशाखा सुभेदारने मानले आभार

"वेगळा प्रवास, वेगळी भूमिका ..आणि "सर्वोत्कृष्ट खलनायिका" हे अवॉर्ड.... रागिणी ( मालिका- शुभविवाह ) खुप आनंद झाला.. Thank u निर्माते महेश तागडे, दिग्दर्शक भरत गायकवाड, विश्वास सुतार, आणि अनिरुद्ध शिंदे,  संपूर्ण कथानक फुलवणारे Shirish Latkar दादा आणि मुखी संवाद पेरणाऱ्या मिथिला सुभाष ताई (रागिणीची आई), आणि माझे सहकलाकार विजय पटवर्धन, शितल शुक्ला, यशोमन आपटे, मधुरा देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र , कुंजिका, काजल पाटील, अक्षयराज, मृणाल देशपांडे, मनोज कोल्हटकर,रुचिर, राजेश साळवी, सगळ्या सगळ्यांचे आभार. tell a tale production house चा Hop अजित सावंत, स्वाती दरणे creative head आणि स्टारप्रवाह. 

खुप आनंद आणि असेच प्रयत्न करीत राहीन. सोहळ्यात सादरीकरण करताना सुद्धा मज्जा आली.. ही संधी दिल्याबद्दल श्रीपाद क्षीरसागर, चिन्मय कुलकर्णी (लेखक ), विशाल मोधावे आणि सतीश sir. ह्यांचे मनापासून आभार", अशी पोस्ट विशाखा सुभेदारने केली होती. 

Vishakha Subhedar reply

चाहतीच्या कमेंटवर दिले हटके उत्तर

तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले होते. पण यातील एका कमेंटने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विशाखाच्या या पोस्टवर तिच्या एका चाहतीने अभिनंदन करताना तिच्या नावाचा उल्लेख चुकीचा केला. "वाह, हार्दिक अभिनंदन, सुलेखा ताई", अशी कमेंट त्या चाहतीने या पोस्टवर केली होती. त्यावर विशाखानेही हटके प्रतिक्रिया दिली आहे. विशाखाने त्या चाहतीला टॅग करत "सुलेखा कोण??" असे विचारले आहे. यानंतर त्या चाहतीने दोन कमेंट केल्या आहेत. यातील एका कमेंटमध्ये तिने "सॉरी विशाखा ताई" असे म्हटले आहे. तर दुसऱ्या कमेंटमध्ये तिने "चुकून लिहिले" असे म्हटले आहे. सध्या विशाखाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.