देवा चित्रपटाचं 'जराशी' हे गाणे प्रदर्शित...

एक अतरंगी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 9, 2017, 08:30 PM IST
देवा चित्रपटाचं 'जराशी' हे गाणे प्रदर्शित... title=

मुंबई : एक अतरंगी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तो म्हणजे देवा. हा सिनेमा वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

गाणे नुकतेच प्रदर्शित

जगण्याची नवी उमेद देणाऱ्या या चित्रपटाचे जराशी जराशी हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. कवी गुरू ठाकूरच्या हस्ते हे गाणे लाँच करण्यात आले.  

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले 

हे गाणे स्वतः गुरू ठाकूरने लिहिले आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अंकुश चौधरी यांच्यावर हे गाणे चित्रीत झाले आहे. या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी केले आहे. हर्षवर्धन वावरे यांच्या गोड आवाजात या गाण्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. हे गाणे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

मुख्य भुमिकेत

या सिनेमात स्पृहा जोशी, अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडीत यांच्या मुख्य भुमिका आहेत.