अ‍ॅक्शनपॅक्ट फास्टर फेणेचा दुसरा टीझरही दमदार !

भा.रा. भागवत लिखित 'फास्टर फेणे' च्या रंजक कथांनी ६० च्या दशकात अनेकांचे आयुष्य व्यापून टाकले होते.

Updated: Sep 23, 2017, 04:28 PM IST
अ‍ॅक्शनपॅक्ट फास्टर फेणेचा दुसरा टीझरही दमदार !  title=

मुंबई : भा.रा. भागवत लिखित 'फास्टर फेणे' च्या रंजक कथांनी ६० च्या दशकात अनेकांचे आयुष्य व्यापून टाकले होते.

आता 'फास्टर फेणे' पुन्हा नव्या रूपात आणि मोठ्या पदद्यावर रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

अभिनेता अमेय वाघ 'फास्टर फेणे' च्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचा पहिला व्हिडिओ टीझर आज रसिकांच्या भेटीला आला आहे.  या टीझरमध्ये 'फास्टर फेणे' या पात्राची रसिकांना झलक दाखवण्यात आली आहे. अमेयचा नवा लूक, पात्राचे स्वरूप या टीझरमधून उलगड्यात आले आहे. या टीझरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या टीझरला रितेश देखमुखचा व्हॉईस ओव्हर आहे.  'फास्टर फेणे' हे ६० च्या दशकातील जरी असले तरीही चित्रपटामध्ये आजची तरूणपिढी आणि रसिकांचा विचार करता काही बदल केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

आदित्य सरपोतदार याने 'फास्टर फेणे'चे दिग्दर्शन केले आहे.'फास्टर फेणे' चित्रपटासाठी अमेयने १० किलो वजन कमी केले आहे. तसेच या चित्रपटातील स्टंट देखील त्याने स्वतः केले आहेत. त्यामुळे टीझरमधून उत्सुकता वाढवाअरा फास्टर फेणे रूपेरी पडद्यावर किती कमाल करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.  रितेश देखमुख आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला 'फास्टर फेणे' २७ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

पहा फास्टर फेणेचा व्हिडीओ टीझर