NEW QUEEN IN THE TOWN, गौतमी देशपांडेचं ग्लॅमरस फोटोशूट

आता या नव्या वेस्टन लूकमधील फोटोशूटला देखील चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेयं.

Updated: Jun 28, 2021, 09:12 AM IST
NEW QUEEN IN THE TOWN, गौतमी देशपांडेचं ग्लॅमरस फोटोशूट title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'माझा होशील ना' ही मालिका सध्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेतील प्रत्येक भागातील ड्रामा प्रेक्षकांना या कलाकारांच्या आणखीनंच जवळ घेऊन येतोयं. त्यामुळेच तर आदित्य -सई पासून मामांपर्यंत सगळीच पात्र प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटू लागली आहेत. त्यात या मालिकेतील सई बिराजदार हिला देखील प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतंय. त्यामुळे  सध्याच्या स्मॉल स्क्रिनवरील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गौतमी देशपांडेचा ही समावेश आहे.

गौतमीचं सोशल मीडियावर देखील मोठं फॅन फोलॉविंग आहे. काही ना काही नवं आणि हटके पोस्ट करत गौतमी इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात येत असते. स्क्रीनवर साध्या भोळ्या अंदाजात दिसणाऱ्या सईने नुकतंच हटके अंदाजात खास फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोंची सध्या चांगलीच चलती पाहायला मिळतेयं.

याआधी गौतमी केलेलं ब्राईडल अंदाजातील फोटोशूट देखील कमालीचे व्हायरल झालं होतं. आता या नव्या वेस्टन लूकमधील फोटोशूटला देखील चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेयं. गौतमी हे फोटो रिवील करताच चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करायला सुरुवात केलीये.

गौतमी अभिनयासह उत्तम गाणं देखील गाते. अनेकदा ती बहिण मृण्मयी देशपांडेसोबत गातानाचे सुरेल व्हिडिओज पोस्ट करत चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असते.