मराठमोळ्या अभिनेत्रीला 'कोरोना'चं औषध

कोरोनामुळे संपूर्ण जगात सध्या हाहाकार माजला आहे.  

Updated: Mar 16, 2020, 12:44 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्रीला 'कोरोना'चं औषध title=

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण जगात सध्या हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव जवळपास १०० देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून खबरदारी बाळगण्याची सूचना देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री गौतमी देशपांडेची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे आणि ही पोस्ट आता एक चर्चेचा विषय ठरत आहे. चर्चेचं कारण म्हणजे तिने पोस्ट केलेला ‘करोना’ गोळ्यांच्या पाकिटाचा फोटो. 

फोटोमधील गोळ्यांच्या पाकिटावर 'कोरोना' असं नाव असल्यामुळे नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. ‘जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर तुम्हाला ‘करोना’ नावाचं औषध देतो… मी खूश होऊ की घाबरू?’, असं गौतमीने या पोस्टमध्ये लिहिलंय.

त्यामुळे गौतमीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. परंतु गौतमीने चाहत्यांच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण दिले आहे. 'मला ताप किंवी सर्दी झाली नाही. हे फक्त व्हिटामिनचे टॅब्लेट आहेत.' त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका असं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे. 

'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौरवी देशपांडे ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. 'माझी होशील ना' मालिकेत गौतमी शिवाय विराजस कुलकर्णी, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार आणि विद्याधर जोशी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.