'माझा छळ केला जातोय... 'मीटू'नंतर तनूश्री दत्ताचा या व्यक्तीवर निशाणा!

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. 

Updated: Jul 21, 2022, 11:29 AM IST
'माझा छळ केला जातोय... 'मीटू'नंतर तनूश्री दत्ताचा या व्यक्तीवर निशाणा! title=

मुंबईः बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त गाजलेले प्रकरण म्हणजे मीटूचे. या सगळ्याशी निगडीत आणि मीटूमुळे पुन्हा चर्चेत आलेली तनूश्री दत्ता आता भलत्याच एका कारणासाठी फेमस झाली आहे. एकेकीळी बॉलीवूडमध्ये आपले करिअर बनवत असतानाच तिच्या आता वेगळ्याच एका वक्तव्याने ती जोरदार चर्चेत आली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या तिच्यावर लोकं भलतेच नाराज झाले आहेत.

मीटूच्या वेळेसही आता हिला बॉलीवूडमध्ये परत येयचे आहे का? आपल्या या नव्या नाटकामुळे तिला बीग बॉसमध्ये जायचे आहे का?, अशी जबरी टिका तिच्यावर केली होती. आता ही तिच्या या नव्या प्रकरणामुळे भलतीच चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. तनुश्री दत्ताने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिला खूप त्रास दिला जात आहे आणि कोणाकडून तरी Target केले जात आहे. याशिवाय बॉलीवूड माफिया, political circit आणि राष्ट्रविरोधी घटकांकडून तिला लक्ष्य केले जात असल्याचेही तुनश्रीने सांगितले आहे. एवढेच नाही तर काहीही झाले तरी ती आत्महत्या करणार नसल्याचे तिने म्हटले आहे.

तनुश्री दत्ताने स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, "मला त्रास दिला जात आहे आणि तिला खूप वाईट पद्धतीने टार्गेट केले जात आहे. कृपया कोणीतरी काहीतरी करा. याआधी गेल्या वर्षभरात माझे बॉलिवूडचे काम उद्ध्वस्त झाले होते. मोलकरीण माझ्या पाण्यात औषधे आणि स्टेरॉईड मिसळत होती. त्यामुळे मला सर्व प्रकारचा आरोग्याशी निगडित त्रास होऊ लागला. यानंतर मी मे महिन्यात उज्जैनला गेले होते तेव्हा माझ्या कारचे ब्रेक दोन वेळा खराब केले गेले आणि त्यानंतर माझा अपघात झाला. मी मरणारच होते आणि 40 दिवसांनी मी मुंबईला परत आले. आता माझ्याच इमारतीतील माझ्या स्वतःच्या फ्लॅटसमोर एक विचित्र घटना घडली. "हे सर्वांनी ऐका, मी आत्महत्या करणार नाही हे निश्चित आहे. मी इथून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहून माझे  करिअर पुन्हा सुरू करेन. आणि ते नेहमीपेक्षा उंचावर घेईन. बॉलीवूड माफिया, महाराष्ट्रातील जुने पॉलिटिकल सर्केल्स (जे अजूनही त्यांचे वर्चस्व राखून आहेत) आणि बेईमान राष्ट्रविरोधी गुन्हेगार घटक सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी एकत्र काम करत आहेत."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

"मला खात्री आहे की #metoo आणि मी उघड केलेल्या NGO चेच लोक या सगळ्यामागे आहेत. नाहीतर मला का टार्गेट करून त्रास दिला गेला असता? लाज वाटली पाहिजे. मी खूप लोकांना ओळखते. मला काढून टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. मी खूप दिवसांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. खूप मानसिक, शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे. हे कसलं जग आहे, जिथे तरुण अन्यायाविरुद्ध उभी राहिले तर त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना मारले जाते?? "मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणि लष्करी राजवट हवी आहे आणि केंद्र सरकारने जमिनीच्या पातळीवरील बाबींवरही नियंत्रण ठेवावे. येथे गोष्टी खरोखर हाताबाहेर जात आहेत. आमच्यासारख्या लोकांना येथे खूप त्रास होत आहे. या जागी आज मी आहे, उद्या तुम्ही देखील असू शकता. 

अशा तऱ्हेची भावनिक पोस्ट तनूश्रीने लिहिली आहे.