'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर फार एक्टिव असतात. त्याचबरोबर ते आपल्या आठवणीही अनेकदा शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रगंलेली असते. यावेळी त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 3, 2023, 12:51 PM IST
'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत  title=
milind gawali shares a post on rajesh khanna govinda as undisciplined actors

Milind Gawali Post: सध्या सोशल मीडियावर मराठी सेलिब्रेटीही व्यक्त होताना दिसतात. त्यातील सर्वात एक्टिव असणारे अभिनेते कोण तर ते म्हणजे मिलिंद गवळी. 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मिलिंद गवळी यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. इन्टाग्रामवर ते चांगलेच एक्टिव असतात. आपल्या प्रेक्षकांसाठी ते कायमच नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. त्यातून त्यांच्याकडे अशा बऱ्याच आठवणी आहेत ज्या ते त्यांच्या पोस्टच्या माध्यमातूनही सांगताना दिसतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यावेळी त्यांनी मोठमोठ्या कलाकारांची नावं घेत आपल्या त्यांच्यासोबतचे अनुभव हे शेअर केले आहेत. कलाकारानंच काय प्रत्येक माणसानं शिस्तबद्ध हे असायलाच हवं. त्यातून आपल्या या चांगल्या सवयीमुळे आपल्याला आपलं ध्येयही साध्य करण्यास सफलता मिळते व त्यातूनच आपल्याला यशही मिळते. आळस, अहंकार, कमजोर एकाग्रता आणि बेशिस्तपणा आपल्याला अफलही करू शकतो. 

यावेळी अभिनेता मिलिंद गवळी यांनी फार सूचक आणि मुद्देसुद पोस्ट लिहिली आहे. त्यांनी कलाकारानं किती शिस्तप्रिय आणि सावध असायला हवं यावर आपला कलाकारांबद्दलचा अनुभव सांगितला आहे. अभिनेता गोविंदा, राजेश खन्ना यांची उदाहरणं दिली आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. आज अख्खी मराठी चित्रपटसृष्टी ही त्यांना देव मानते. त्यांच्याविषयीही अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक आठवण सांगितली आहे. 

त्यानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “असेल हरि तर देईल खाटल्यावरी” किंवा “नशिबात असेल तर मला मिळेल” असं म्हणून चालत नाही. तुम्हाला स्वतःला हात पाय हलवावेच लागतात, कष्ट करावे लागतात, जे काही ध्येय गाठायचं असेल, त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावं लागतं आणि असं नाही आहे की कोणाला नशिबाने मिळत नाही किंवा हरी खटल्यावर देत नाही, पण जे काही कष्ट न करता मिळालेलं असतं ते फार काळ टिकतही नाही असा माझा अनुभव आहे.

कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळाच असतो आणि कष्ट करणं म्हणजे अगदी गदा मजदूरी करणे असेही नाह. कष्ट करण्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचे आहे. कष्ट करणे म्हणजे दिलेल्या वेळा पाळणे, यालाही खूप महत्त्व आहे. punctuality हा शब्दच बऱ्याचशा लोकांच्या dictionary मध्येच नसतो आणि असं नाही आहे की त्यांना यश मिळत नाही, मिळतं त्यांना पण यश मिळतं, खूप यश मिळतं... 

Punctual नसणारे आणि indiscipline कलाकार उदाहरणार्थ राजेश खन्ना, गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा आणि disciplined, punctual कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन याचं नाव घेतलं जातं शशी कपूर याचं नाव घेतलं जातं. नंतरच्या पिढीतले आमिर खान, अक्षय कुमार यांचं नाव घेतलं.

हेही वाचा : हजार कोटींचा सिनेमा? अनुराग कश्यप म्हणाला, 'कधीच नाही...'

तुमचं जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर तुम्हाला, तुमचं काम कष्टाच वाटत नाही. एकदा मला अशोक सराफ म्हणाले होते की, ज्या वेळेला सकाळी उठल्यानंतर मला असं वाटेल “अरे यार आज शूटिंग आहे”, शूटिंगचा मला कंटाळा येईल, त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन. आणि खरंच मला तर सकाळी पाच वाजता उठल्यावर शूटिंग करायचा उत्साह असतो.  अगदी फिल्मचं किंवा सिरियलचं शूटिंग असायला पाहिजे असं काही नाही अगदी मग हे आजचं आशय बरोबरच फोटोशूट असलं तरी तो उत्साह काही कमी होत नाही. तसाच उत्साह, तीच positive energy cameraman आशय मध्ये असते. सगळी अरेंजमेंट करणाऱ्या श्रीमध्ये असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दर्शना हजारे शानबागने तयार केलेले Costumes, press iron करणारा संकेतमध्ये असते, मेकअप करणारा समीर म्हात्रे मध्ये, रुक्सार आणि राजूमध्ये असते. या सगळ्यांची collective, strong, positive energy, magic create करत असते. मग डोक्यावर कडक ऊन असलं तरी, घामाच्या धारा वाहत असल्या तरी, शूटिंग करत असताना मनावर थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करत असते असंच वाटतं !”, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.