अंकितासोबतच्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाली मिलिंदची ex गर्लफ्रेंड

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण मुंबईजवळील अलिबाग येथे पारंपर‍िक पद्धतीने २५ वर्षीय लहान गर्लफ्रेंड अकिंता कोनवार हिच्याशी विवाहबद्ध झाला. मिलिंद ५२ वर्षांचा तर अंकिता २७ वर्षांची आहे. दोघांच्या वयातील असलेल्या अंतरावरुन सुरुवातीला फार नकारात्मक चर्चा केल्या जात होत्या. मात्र दोघांनी लग्न करत टीकाकारांना उत्तर दिले. 

Updated: Apr 25, 2018, 11:30 AM IST
अंकितासोबतच्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाली मिलिंदची ex गर्लफ्रेंड title=

मुंबई : मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण मुंबईजवळील अलिबाग येथे पारंपर‍िक पद्धतीने २५ वर्षीय लहान गर्लफ्रेंड अकिंता कोनवार हिच्याशी विवाहबद्ध झाला. मिलिंद ५२ वर्षांचा तर अंकिता २७ वर्षांची आहे. दोघांच्या वयातील असलेल्या अंतरावरुन सुरुवातीला फार नकारात्मक चर्चा केल्या जात होत्या. मात्र दोघांनी लग्न करत टीकाकारांना उत्तर दिले. 

मिलिंदच्या लग्नात कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. मिलिंद-अंकिताच्या लग्नाची बीटाऊनमध्ये चांगलीच रंगली होती. या लग्नावर मिलिंदची ex गर्लफ्रेंडने प्रतिक्रिया व्यक्त केली. लग्नाबाबत मिलिंदची आधीची गर्लफ्रेंड शहाना गोस्वामीने आनंद व्यक्त केलाय. मिलिंद माझा चांगला मित्र आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. मला त्यांच्या लग्नाने खूप आनंद झालाय, असे शहाना म्हणालीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार मिलिंद आणि शहाना बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. 

तसेच मिलिंदच्या या लग्नात त्याची आणखी एक ex गर्लफ्रेंड आपल्या पतीसह आली होती. दीपानिताने इन्स्टाग्रामवर मिलिंदसोबतचा फोटो शेअर केलाय. तसेच नव्या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्यात.

मिलिंद आणि दीपानिता यांच्या अफेयरची चर्चा २००२मध्ये चांगलीच रंगली होती. दोघांनी १६ डिसेंबर(२००२) आणि जोडी ब्रेकर्स(२०१३० या सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. १६ डिसेंबरमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.