'Mirzapur 3'... थरार आणि बोल्डनेसची पहिली झलक पाहून व्हाल थक्क

'मिर्झापूर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं.   

Updated: May 13, 2022, 10:53 AM IST
'Mirzapur 3'... थरार आणि बोल्डनेसची पहिली झलक पाहून व्हाल थक्क  title=

मुंबई : कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि वेब सीरिज.... हे गणित आज प्रत्येकाला माहिती आहे. याचं काळत सर्वांत जास्त चर्चा रंगली ती म्हणजे 'मिर्झापूर' सीरिजची. 'मिर्झापूर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं. त्यानंतर आता प्रत्येक जण 'मिर्झापूर 3' च्या प्रतीक्षेत आहेत. पण आता प्रेक्षकांनी प्रतीक्षा करण्याचं काही कारण नाही. कारण सीरिजचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेला फोटो दुसऱ्या तिसऱ्याचा नसून, अभिनेता अली फजलचा आहे. अली फजलने सीरिजमध्ये गुड्डू पंडितच्या भूमिकेला न्याय दिलं.  सीरिजच्या शेवटच्या दोन सीझनला मिळालेल्या प्रचंड प्रेमानंतर, निर्मात्यांनी काही काळापूर्वी मिर्झापूरचा सीझन 3 ची घोषणा केली. 

आता अली फजल म्हणजे गुड्डू पंडितने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'And the time begins!! Prep, rehearsals, readings. Bring it on..' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांसोबतच शोमध्ये गोलूची भूमिका साकारणाऱ्या श्वेता त्रिपाठीनेही कमेंटमध्ये 'वेटिंग' असे लिहिले आहे. 

मिर्झापूरचा पहिला सीझन 2018 मध्ये आला होता आणि दुसरा 2020 मध्ये आला होता. मिर्झापूर  एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे. आता सीरिजच्या तिसऱ्या भागाच्या रिलीजच्या तारखेची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.