'मिर्झापूर' फेम अभिनेत्यावर लॉकडाऊनमध्ये लाडू विकण्याची वेळ

कोरोना व्हायरस आणि कोरोना विषाणूमुळे लागल्या लॉकडाऊनने  सर्व होत्याचं नव्हतं केलं आहे. 

Updated: May 28, 2021, 09:29 AM IST
'मिर्झापूर' फेम अभिनेत्यावर लॉकडाऊनमध्ये लाडू विकण्याची वेळ title=

मुंबई : कोरोना व्हायरस आणि कोरोना विषाणूमुळे लागल्या लॉकडाऊनने  सर्व होत्याचं नव्हतं केलं आहे. कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय  बंद पडले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या विषाणूचा फटका फक्त सर्वसामान्य जनतेला नाही तर  सेलिब्रिटींना देखील बसला आहे. कोरोनामुळे रोजगार गेलेल्या लेकांच्या यादीत 'मिर्झापूर' फेम अभिनेता राजेश तैलंग देखील आहेत.  राजेश तैलंग यांनी 'मिर्झापुर'मध्ये 'रमाकांत पंडित' ही भूमिका साकारली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेक चित्रपटांमध्ये देखील भूमिका बजावणारे राजेश तैलंग आता रस्त्यांवर लाडू विकत आहेत. राजेश तैलंग यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत लाडू विकत असल्याची माहिती दिली आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न देखील विचारले आहेत. 

फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'लॉकडाऊन संपेल, कोरोना जाईल तेव्हा पुन्हा कामाला नव्याने सुरूवात करू...' असं त्यांनी  लिहिलं आहे. राजेश तैलंग  यांच्या फोटोवर एक युझर म्हणाला कोण आहे? यावर राजेश म्हणाले, 'भाई मी राजेश तैलंग आहे. एक अभिनेता.' अशा कमेन्ट त्यांच्या या  फोटोवर आल्या आहेत.