'Mirzapur' कालिन भैय्याच्या सुनेचा बिकिनी लूक, पाहा हॉट फोटो

कालिन भैय्याची सून खऱ्या जीवनात इतकी बोल्ड, फोटो पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का  

Updated: May 29, 2022, 11:32 AM IST
'Mirzapur' कालिन भैय्याच्या सुनेचा बिकिनी लूक, पाहा हॉट फोटो title=

मुंबई : 'मिर्झापूर 2' वेब सीरिजमध्ये माधुरी यादवच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेली ईशा तलवार तिच्या बॉल्डनेसने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. सीरिजमध्ये साडीत दिसणारी ईशा खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस आहे. कालिन भैय्याची सून म्हणून दिसलेल्या ईशाच्या हॉटनेसमुळे इंटरनेटचं वातावरण तापलं आहे. 

सध्या इशाचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिचे फोटो पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर ईशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

सध्या सर्वत्र ईशाच्या बिकिनी फोटोंची चर्चा आहे. फोटोंमध्ये ईशा तलवारने तिची परफेक्ट फिगर दाखवली आहे. तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात. कमेंट सेक्शनमध्ये ईशाचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत.

'मिर्झापूर'मध्ये ईशा तलवारने मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्माच्या पत्नी माधुरी यादवची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. नुकताचं 'मिर्झापूर 3' ची घोषणा झाली आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा दिसणार आहे.