Mirzapur Season 3 Teaser : ‘भूल तो नहीं गए हमें’, 'मिर्झापूर 3' ची पहिली झलक पाहिली का? पाहा VIDEO

Mirzapur Season 3 Teaser : सर्वात लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूर 3 ची पहिली झलक समोर आली आहे. पहिल्या दोन सिझनला मिळालेल्या यशानंतर  आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता तिसरा सिझनची घोषणा केली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 20, 2024, 10:23 AM IST
Mirzapur Season 3 Teaser : ‘भूल तो नहीं गए हमें’, 'मिर्झापूर 3' ची पहिली झलक पाहिली का? पाहा VIDEO  title=

Mirzapur Season 3 Teaser : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक गाजलेल वेब सीरीज म्हणजे मिर्झापूर. मिर्झापूर आणि मिर्झापूर 2 या दोन सिझनला मिळालेल्या यशानंतर आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता तिसरा सिझनची घोषणा केली होती. तेव्हापासून प्रेक्षक मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझजनची वाट पाहत होते. मिर्झापूर 2 या वेबसीरीजमध्ये कालेन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीचा मुलगा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्मा याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तेव्हापासून प्रेक्षकांना मिर्झापूर 3 ची वाट पाहत आहे. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून मिर्झापूर 3 ची पहिली झलक समोर आली. 

2018 मध्ये मिर्झापूर या वेबसीरिजचा पहिला सिझन रिलीज झाला होता. पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर 2020 मध्ये दुसरा सीझनल लॉंच करण्यात आला होचा. मिर्झापूर 2 या सीझनलाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मिर्झापूर 3 चा तिसरा सीझनची पहिली झलक समोर आली आहे.  #areyouready या  कार्यक्रमात प्राइम व्हिडीओने 70 फिल्म आणि मिर्झापूर 3 ची घोषणा केली.  मिर्झापूर 3 या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, विजय वर्मा, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. 

मिर्झापूर 3 व्हिडीओमध्ये काय?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

प्राइम व्हिडीओच्या या व्हिडीओमध्ये पंकज त्रिपाठी म्हणजेच कालीन भैयाची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एका झऱ्याच्या काठावर कालीन  भैया उभा राहून म्हणतो की, 'आम्हाला विसरला तर नाही ना', अली फजल, विजय वर्मा, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी आणि इशा तललार सारख्या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. 

या व्हिडीओमध्ये अली फजलचं कॅरेक्टर गुड्डु पंडीत दाखवण्यात आलं आहे. गुड्डु पंडित आपल्या भौकाली अंदाजात लोकांना म्हणतो की, शहर क्या बुलाता है हमको, याच्या उत्तरता समोर उभी असलेली गर्दी गुड्डू भैया असं म्हणते. डिसेंबर 2022 मध्येच अली फजल यांनी मिर्झापूर  3 ची शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता प्राइम व्हिडीओच्या इव्हेंटमध्ये अली फजलने म्हटलं की, तिसरा सीझन  हा पहिल्या सीझनप्रमाणे असणार आहे. यासोबतच सीझनमध्ये काही नवीन पात्र देखील दिसतील तर काही जुन्या पात्रांची कहानी ही संपेल.