'आई आजही करते लोकल ट्रेनने प्रवास ', Miss India मध्ये सहभागी होऊनही 'तिला' का करावा लागतोय संघर्ष

कालच या शोमधून शोमध्ये सामील होणाऱ्या कन्टेस्टंटची नावं जाहीर झाली. 

Updated: Oct 2, 2022, 12:19 PM IST
 'आई आजही करते लोकल ट्रेनने प्रवास ', Miss India मध्ये सहभागी होऊनही 'तिला' का करावा लागतोय संघर्ष title=

Bigg Boss Manya Singh: बिग बॉस हिंदी कालपासून सुरू झालं आहे. या शोची सगळेच आतुरतेनं वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून हा शो सुरू झाला आहे. हा शो मागच्या इतर सिझन्सपेक्षा वेगळा आहे आणि यावेळी या शोमधून वेगळा थरारही पाहायला मिळणार आहे. (miss india runner up manya singh shares her struggling story right now says father still drives auto riskshaw)

कालच या शोमधून शोमध्ये सामील होणाऱ्या कन्टेस्टंटची नावं जाहीर झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं यावेळी या शोमधून एकमेकांशी भिडणार आहेत. सलमान खाननेही स्पर्धकांचे जल्लोषात स्वागत केले आहे. 

यावेळी ब्यूटी क्विन मान्या सिंगनं बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. मागच्या वर्षी मान्या सिंगनं मिस इंडिया या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मिस इंडिया झाल्यानंतरही मन्याला काम का मिळाले नाही असं ती म्हणते. 

तिनं बिग बॉसमध्ये प्रवेश करताना आपली संघर्षमय कथा सांगितली. ती म्हणाली की मी मिस इंडिया शोमध्ये गेल्यामुळे लोकांना वाटलं असेल की माझ्याकडे भरपूर पैसा आलाय. परंतु तसं नाहीये. मिस इंडिया या शोमध्ये सहभागी होऊनही मला काम मिळालं नाही. दोन वर्षाच्या प्रदीर्घ गॅपनंतर मला एक कर्मशियल मिळालं असं तिनं सांगितलं. 

पैसे वाचावे म्हणून आजही ती आपल्या वडिलांच्या रिक्षातून प्रवास करते. तिची आईही लोकल ट्रेननं प्रवास करते. 

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपली संघर्षमय कहाणी सांगताना तिला खूपच भरून आलं. सलमाननं यावेळी तिला धीर दिला. आपली कहाणी सांगताना तिनं एक गोष्ट कबूल केली की तिला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे. त्याचसोबतच तिला भरपूर पैसे कमावायचे आहेत ज्यासाठी तिनं बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली आहे. 

मन्या सिंग ही एका ऑटो चालकाची मुलगी आहे. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे.