मिस यूनिवर्सचं अमेरिकेतील भव्य घर, व्हिडीओ पाहून तुम्हाला बसणार नाही विश्वास

पाहा तिच्या नव्या घराची एक झलक  

Updated: Jan 9, 2022, 12:04 PM IST
मिस यूनिवर्सचं अमेरिकेतील भव्य घर, व्हिडीओ पाहून तुम्हाला बसणार नाही विश्वास title=

मुंबई : भारतातील 21 वर्षाची हरनाज कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय. याआधी 2000 मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने आणि 1994 मध्ये सुष्मिता सेनने देखील हा मान पटकावला होता. इजराईलच्या इवियट शहरमध्ये पार पडलेल्या LIVA मिस डीवा यूनिवर्स 2021 मध्ये हरनाज सिंधूने 75 देशाच्या सुंदर महिलांवर मात करत हा पुस्कार आपल्या नावे केलाायं. 

मिस यूनिवर्स किताब पटकावल्यानंतर हरनाझ संधू तिच्या नव्या घरी रहायला गेली. हरनाझ न्यूयॉर्क शहरातील एका अपार्टमेंट राहण्यासाठी गेली आहे. मिस यूनिवर्स सोशल मीडिया अकाउंटवरून हरनाझच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

व्हिडीओमध्ये ती अत्यंत आनंदी दिसत आहे. शिवाय हरनाझ तिच्या नव्या आणि भव्य घराचा कुलूप खोलताना दिसत आहे. मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावल्यानंतर हरनाझला गिफ्ट म्हणून एका वर्षासाठी अपार्टमेंट देण्यात आला आहे. 

मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावल्यानंतर हरनाझलारोख बक्षीसासोबतच, हरनाजला इतरही अनेक सुविधा

-फ्री वर्ल्ड टूर
- न्यूयॉर्क शहरातील मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये वर्षभर राहता येईल. कदाचित तिला मिस यूएसएसोबत हा फ्लॅट शेअर करावा लागेल.
-मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये तिच्या एक वर्षाच्या वास्तव्यादरम्यान किराणा सामान आणि वाहतूक यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.
-तिला मेकअप आर्टिस्ट आणि असिस्टंटची टीमही मिळेल.
-एक वर्षासाठी तिला मेकअप, हेअर स्टाईल, शूज, कपडे आणि स्किन केअर उत्पादने मिळतील.
- व्यावसायिक शैली, त्वचाविज्ञान आणि दंत सेवा मिळतील..
-प्रवास करताना हॉटेलचा मुक्काम आणि जेवणाचा खर्च. या सगळ्या सुविधा तिला मोफत मिळतील.