पद्मावती वाद : मानुषी छिल्लरचा दीपिका पादुकोणला पाठिंबा

भारताला तब्बल १६ वर्षांनंतर ' मिस वर्ल्ड' हा किताब मिळवून देणारी मानुषी छिल्लर काल मुंबईत दाखल झाली.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 28, 2017, 01:01 PM IST
पद्मावती वाद : मानुषी छिल्लरचा दीपिका पादुकोणला पाठिंबा   title=

मुंबई : भारताला तब्बल १६ वर्षांनंतर ' मिस वर्ल्ड' हा किताब मिळवून देणारी मानुषी छिल्लर काल मुंबईत दाखल झाली.

मुंबईत आल्यानंतर मानुषीने सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर मीडियाशीदेखील संवाद साधला.

बॉलिवूडचा विचार नाही 

'मिस वर्ल्ड' किताब जिंकल्यानंतर लगेजच चित्रपट करण्याचा विचार नाही असे मानुषी म्हणाली. सध्या ती मासिकपाळी आणि स्वच्छता  याबाबत समाजामध्ये जनजागृतीचं काम करण्याकडे लक्ष देणार आहे.  

'पद्मावती'ला पाठिंबा 

करणी सेनेसह समाजातील अनेक संघटनांचा या चित्रपटाला विरोध आहे. त्यांच्यामते चित्रपटात इतिहासातील काही संबंध चूकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत. यावरून सुरू झालेल्या वादाबाबत मानुषीनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

मानुषीच्या मते, स्त्री कोणत्याही पदावर असो पण भारतीय स्त्रीयांना सतत समाजात  संघर्षाला सामोरं जावं लागतं. पण आपल्याला असं काम करायला हवं ज्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. 

बॉलिवूडमधील आवडते अभिनेता / अभिनेत्री 

मानुषी बॉलिवूडची चाहती आहे. तिला भविष्यात आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. तसेच मानुषी प्रियंका चोप्राची चाहती आहे.