...या अभिनेत्यासोबत करायचंय मानुषी छिल्लरला काम!

यंदाचा मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावावर नोंदवल्यानंतर मानुषी पुढे काय करणार? असा साहजिकच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. 

Updated: Nov 28, 2017, 03:55 PM IST
...या अभिनेत्यासोबत करायचंय मानुषी छिल्लरला काम! title=

नवी दिल्ली : यंदाचा मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावावर नोंदवल्यानंतर मानुषी पुढे काय करणार? असा साहजिकच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. 

मानुषी बॉलिवूडमध्ये दिसणार का? तिला बॉलिवूडमध्ये यायची इच्छा आहे का? असे प्रश्न तिलाही विचारले गेले. तिनं या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर दिलंय.

मानुषीला अभिनेता आमिर खानच्या सिनेमात काम करायला आवडेल, असं तिनं म्हटलंय. आमिर खान सामाजिक - प्रासंगिक सिनेमे बनवण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे त्याच्या सिनेमांत झळकायला आवडेल, असं मानुषी सांगतेय. 

हरियाणाची रहिवासी असलेल्या आणि मेडिकलची विद्यार्थीनी असलेल्या मानुषीला बॉलिवूडचे सगळेच कलाकार आवडतात मात्र आमिर आणि माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोपडा तिचे आवडते कलाकार आहेत. 

'मला आमिर खानच्या सिनेमांत काम करायला आवडेल. मला वाटतं की त्याच्याकडे ज्या भूमिका असतात त्या नेहमीच आव्हानात्मक असतात. सोबतच त्याच्या सिनेमांत एक सामाजिक संदेशही असतोच...' असं म्हणत मानुषीनं आपली बॉलिवूड पदार्पणाची इच्छाही व्यक्त केलीय.