आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Updated: Aug 1, 2019, 09:07 PM IST
आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सची एन्ट्री सुरु आहे. स्टारकिड बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहेत. जान्हवी कपूर, सारा अली खान यांच्यानंतर आता बॉलिवूडमध्ये आणखी एक स्टारकिड पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा छोटा मुलगा नमाशी चक्रवर्ती आगामी 'बॅड बॉय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचंही बोललं जात आहे. 

राजकुमार संतोषी यांनी 'बॅड बॉय' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातून निर्माते साजिद कुरेशी यांची मुलगी अमरीनही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

जल्द आने वाले हैं राजकुमार संतोषी के 'बैड बॉय'! रोमांटिक कॉमेडी के लिए हो जाइये तैयार

'बॅड बॉय' चित्रपटाचं शूटिंग 60 दिवसांत पूर्ण करण्यात आलं आहे. चित्रपटाचा अधिकतर भाग हा बेंगळुरु आणि मुंबईमध्ये चित्रित करण्यात आला आहे. आता चित्रपटाचे निर्माते काही गाण्यांचं शूटिंग परदेशात करणार आहेत.

'बॅड बॉय' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा महाक्षय चक्रवर्तीनेही 2008 मध्ये 'जिमी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याने डीजेची भूमिका साकारली होती.