Mohnish Bahl : सलमान खानशी पंगा घेणारा मोहनीश बहल का नाही पाहायचा आईचे चित्रपट?

Mohnish Bahl Birthday : कधी खलनायक तर कधी संस्कारी मुलगा...संजीवनीमधील डॉक्टर हा अभिनेता प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीचा मुलगा तरीदेखील आईचे चित्रपट तो कधीच नाही बघायचा. 

नेहा चौधरी | Updated: Aug 14, 2023, 09:59 AM IST
Mohnish Bahl : सलमान खानशी पंगा घेणारा मोहनीश बहल का नाही पाहायचा आईचे चित्रपट?  title=
mohnish bahl birthday special actress nutan son salman khan Mohnish Bahl unknown facts in marathi

Mohnish Bahl Unknown Facts : मुंबईत 14 ऑगस्ट 1961 प्रसिद्ध आणि लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री नतून यांच्या पोटी मोहनीश बहलचा जन्म झाला. लहानपणापासून घरात अभिनयाचे धडे त्याला आई नूतन आणि मावशी तनुजाकडून मिळतं होते. काजोल आणि तनिषा त्याची मावस बहिणी. त्यामुळे स्वाभाविकच तोही चित्रपटसृष्टीकडे ओढला गेला. कधी खलनायक तर कधी संस्कारी मुलीची भूमिका करणारा मोहनीशने इंडस्ट्रीत 25 वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. त्याचा वाढदिवसानिमित्त  मोहनीश बहलशी संबंधित रंजक किस्से सांगत आहोत. (mohnish bahl birthday special actress nutan son salman khan Mohnish Bahl unknown facts in marathi)

पहिला चित्रपट 

संजय दत्त आणि पद्मिनी कोल्हापुरी यांच्या 1983 मध्ये बेकरार या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तेरी बनहो में, मेरी अदालत, पुराण मंदिर, इतिहास, मैने प्यार किया, अस्तित्व, फोर्स, जय हो, प्रेम जोग, राजा की आयेगी बारात, लाडला, डान्सर, दीवाना आणि हम आपके है कौन या सुपरहिट चित्रपटात त्याच्या भूमिकेने चाहत्यांची मनं जिंकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohnish Bahl (@mohnish_bahl)

कधी खलनायक तर कधी संस्कारी मुलगा

'मैने प्यार किया' या चित्रपटातून नूतनच्या मुलाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा स्टाईलने चाहत्यांची मनं तर जिंकली दिग्दर्शकांनी त्याला ऑफर द्यायला सुरुवात केली. हा चित्रपट मिळण्यामागेही एक किस्सा आहे. खरं मोहनीश बहलला चित्रपटात अभिनयाशिवाय दोन गोष्टींची आवड होती. एक म्हणजे बॉडी बिल्डिंग आणि दुसरी पायलट होण्याचे त्याचं स्वप्न.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohnish Bahl (@mohnish_bahl)

एका दिवशी हॉटेलमध्ये सलमान आणि मोहनीश एकमेकांच्या समोर आलेत. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यावेळी सलमान अतिशय पातळ आणि दुबळा होता. त्यामुळे गंमतीत मोहनीशने सलमान खानशी पंगा घेतला. तो म्हणाला की तू काय हिरो बनशील, माझी एवढी बॉडी असून मी काही करु शकलो नाही. ही दोन मित्रांमधील गंमत होती, पण पुढे जाऊन सलमान खान बॉलीवूडचा सुपरस्टार झाला. 

मैने प्यार किया या चित्रपटात मुख्य अभिनेत्यासाठी सूरज बडजात्याने सलमान खानला साईन केलं. त्यावेळी मोहनीशने सलमानकडे कामासाठी शिफारस करण्यासाठी विनंती केली. तेव्हा सलमान सूरज बडजात्याशी मोहनीशच्या कामाबद्दल बोलला. त्याला खलनायकाची भूमिका करण्यास सांगण्यात आलं. 

पण एका दिवशी सूरज बडजात्या यांचे आजोबा आणि राजश्रीचे प्रमुख ताराचंद बडजात्या यांना मोहनीश हा नूतनचा मुलगा असल्याचे कळले आणि ते गोंधळात पडले. त्यावर नूतने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. माझ्या मुलगा आहे म्हणून तुम्ही कसलाही विचार करु नका. त्याला खलनायकाची भूमिका साकारु द्या. पण त्यावेळी ताराचंद यांनी नूतन यांना वचन दिलं होतं. पुढे जाऊन त्याला मी नक्की एका अभिनेत्याची भूमिका देईल.

 मैने प्यार कियामधून खलनायक मोहनीश बहल हिट झाला. मग या फ्लॉप हिरोला ए लिस्टर चित्रपट मिळायला लागली. सलमान खानचा बागी, ​​शाहरुख खानचा डेब्यू चित्रपट दिवानापासून हिनापर्यंत या चित्रपटातील भूमिकेतून त्यांने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohnish Bahl (@mohnish_bahl)

म्हणून तो आईचे पिक्चर कधी पाहत नाही

मोहनीश बहल आणि आई नूतन यांचं खूप भावनिक नातं आहे. 16 जुलै 1989 ला  सकाळी मोहनीश कळलं की,नूतन यांची तब्येत ठीक नाही. कुटुंबीय नूतन यांना रुग्णालयात हलवलं. त्यावेळी काही चाचण्या केल्यानंतर समजलं की, नूतन यांना कॅन्सर झाला आहे. नूतन यांना उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यादरम्यान मोहनीश बहल यांना 'शोले और शबनम'चं शूटिंग पूर्ण करण्यासाठी जायचं होतं. त्यामुळे हॉस्पिटलच्या खोलीत आईला भेटायला गेले हीच त्यांची शेवटची भेट होती. 21 फेब्रुवारी 1991 ला नूतन यांनी अखेरचा श्वास घेतला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohnish Bahl (@mohnish_bahl)

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मोहनीशला अभिनयाचं कौशल्य त्याच्या आई नूतनकडून मिळाला असल्या तरी आजही मोहनीश आईचे चित्रपट पाहत नाही. खरं तर, आई नूतन यांचे चित्रपट पाहून मोहनीश खूप भावूक होतात आणि त्यांच्या आठवणीने रडू कोसळतं.