आणखी किती लपवणार? मौनी रॉयच्या हळदीचे फोटो समोर

सध्या सर्वत्र मौनी रॉयच्या फोटोंची चर्चा  

Updated: Jan 26, 2022, 03:03 PM IST
आणखी किती लपवणार? मौनी रॉयच्या हळदीचे फोटो समोर title=

मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत. अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नानंतर आता अभिनेत्री मौनी रॉयलग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत सप्तपदी घेण्यासाठी तयार झाली आहे. आता लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. 

मौनीने तिच्या रिलेशनशिप आणि लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आता तिच्या हळदीचा फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनी रॉय लाईफलाईन या सोशल मीडिया पेजवर मौनीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तिच्या नव्या फोटोची चर्चा आहे. पण याबद्दल मौनीने काही सांगितलेलं नाही. 

कोण आहे मौनीचा बॉयफ्रेंड? 
सूरज नांबियार व्यवसायाने बँकर असून तो दुबईत स्थायिक आहे. 27 जानेवारी लग्नापूर्वी म्हणजेच 25 आणि 26 जानेवारीला लग्नापूर्वीच्या सर्व विधी संपन्न होणार आहेत. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच मौन बाळगणाऱ्या मौनीने आजतागायत तिच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.