मुकेश अंबानींकडून Nita Ambani यांना मिळालेली ती गोष्ट आज कुणाकडेच नाही

नीता अंबानी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास रॉयल चार्टर्ड विमान भेट देण्यात आल्याची ही चर्चा आहे.

Updated: Jan 8, 2022, 04:58 PM IST
 मुकेश अंबानींकडून Nita Ambani यांना मिळालेली ती गोष्ट आज कुणाकडेच नाही   title=

मुंबई : रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची संपूर्ण जगाला कल्पना आहे. अंबानी कुटुंबाची जगभरात एक खास ओळख आहे. मुकेश अंबानी हे बिझनेस जगतातील एक मोठे नाव आहे, त्यांची अनेकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते, परंतु त्यांचे कुटुंब देखील अनेकदा सगळ्यांचं लक्षवेधून घेते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना विशेषत: चर्चेत असतात.

नीता अंबानी यांची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. त्याच वेळी, त्याचे सौंदर्य लोकांना खूप आकर्षित करते. तसंच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या आवडी निवडी ही खूप मोठ्या आहेत. त्या लाखो रुपये किंमत असलेला चहा पितात आणि मोठ्या ब्रॅण्ड्सचे कपडे वापरतात. तसेच, त्या महागडे फोन वापरतात. त्यांची आवड इथेच संपत नाही. त्यांना लक्झरी रॉयल चार्टर्ड विमानांमध्ये प्रवास करायाला खूप आवडतं असं बोललं जात आहे. 

नीता अंबानी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास रॉयल चार्टर्ड विमान भेट देण्यात आल्याची ही चर्चा आहे. त्यांचे पती मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी ट्रॅव्हल्स हे विमान  2007 मध्ये 44 व्या वाढदिवशी त्यांना भेट दिले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीता अंबानी यांच्या एअरबेस 319 कॉर्पोरेट विमानाची किंमत 242 कोटी रुपये आहे.

नीता अंबानी के पास है रॉयल चार्टर्ड प्लेन, कीमत जानकार उड़ जायेंगे होश

बोललं जात की, नीता अंबानी यांच्याकडे आलिशान रॉयल चार्टर्ड विमानासारख्या सर्व सुविधा आहेत. आतील सौंदर्य पाहून याला उडता राजवाडा म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विमानात इतर पंचतारांकित हॉटेल्सप्रमाणेच सुविधा आहेत. पार्टी एरिया, लाईव्ह बार आणि जकूझीपासून शॉवरपर्यंत सर्व काही या विमानात मिळू शकते.

नीता अंबानी के पास है रॉयल चार्टर्ड प्लेन, कीमत जानकार उड़ जायेंगे होश

यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की नीता अंबानी यांना कोणत्या प्रकारचा छंद आहे. विमानाच्या आत आरामात बसून बिझनेस डील किंवा बिझनेस प्लॅन करता येतात.

नीता अंबानी के पास है रॉयल चार्टर्ड प्लेन, कीमत जानकार उड़ जायेंगे होश

 

त्यासाठी तशी व्यवस्था करण्यात आली आहे. दिवाणखान्यात खाण्यापिण्याची शाही व्यवस्था करण्यात आली आहे. येथे नीता पाहुण्यांसोबत लंच किंवा डिनर करतात.

नीता अंबानी के पास है रॉयल चार्टर्ड प्लेन, कीमत जानकार उड़ जायेंगे होश

एअरबस 319 कॉर्पोरेट विमानात एक नाही, तर अनेक डायनिंग एरिया आहेत. या विमानाची खास गोष्ट म्हणजे ते बुलेट प्रूफ आहे. ते अत्यंत सुरक्षित आहे.