बलात्कार प्रकरणी या अभिनेत्याला अटक

अभिनेता मनोज पांडे याने वारंवार माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका भोजपुरी गायिकेने केला आहे. लग्नाचे आणि सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे.

Updated: Sep 22, 2017, 10:58 AM IST
बलात्कार प्रकरणी या अभिनेत्याला अटक title=
Image Credit top10bhojpuri.blogspot.in

मुंबई : अभिनेता मनोज पांडे याने वारंवार माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका भोजपुरी गायिकेने केला आहे. लग्नाचे आणि सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे.

तिच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी मनोज पांडेला अटक केली आहे.

ही महिला आणि मनोज गेल्या पाच वर्षांपासून एकत्र राहत होते. त्याने तिला एकदा गर्भपातही करण्यास भाग पाडल्याचे महिलेने सांगितले. मनोजने लग्नाचे आमिष दाखवून माझी फसवणूक केली. माझ्याऐवजी त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केले आहे, असा आरोपही या तरुणीने केलेला आहे. १५ सप्टेंबर रोजी तिने मनोजविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

अनेक दिवसांपासून मनोज पोलिसांपासून लांब पळत होता. आज अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मनोज आणि पीडिता दोघेही उत्तर प्रदेशमधील आहेत. मनोज 'सौगंध गंगा मईया के', 'कईसन पियवा के चरितर बा', 'लहरिया लूट ए राजा जी', आणि 'लाल चुनरिया वाली' यासह अनेक भोजपुरी सिनेमात काम केलेले आहे. त्याने काही हिंदी सिनेमातही भूमिका साकारलेल्या आहेत.