रियालिटी शोनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले मन्नारा-मुनव्वर! रात्रभर केली पार्टी

'बिग बॉस 17'नंतरही या शोमधील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. नेहमीच हे कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. 

Updated: Feb 7, 2024, 03:58 PM IST
रियालिटी शोनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले मन्नारा-मुनव्वर! रात्रभर केली पार्टी title=
फोटो सौजन्य - विरल भयानी (इन्स्टाग्राम)

मुंबई :  बिग बॉस सीझन 17 चा पहिला रनरअप राहीला आहे. नुकतीच अभिषेक कुमारने एक जबरदस्त पार्टी होस्ट केली होती. ज्यामध्ये बरेच एक्स  कंटेस्टेंट्सने हजेरी लावली होती. शो संपल्यानंतर पहिल्यांदाच मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्राची भेट झाली आणि या दरम्यान कॉमेडियन सेकंड रनरअप ठरलेली अभिनेत्रीची खिल्ली उडवताना दिसले. पाहा त्यांचा हा व्हिडीओ.

सलमान खानचा सगळ्यात जास्त चर्चेत असणारा शो 'बिग बॉस 17' आता संपला आहे. मात्र यातील कंटेस्टंट कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरात मुन्नवर फारुकी आणि मनारा चोप्राच्याची मैत्री आणि दुश्मनी दोन्ही पाहायला मिळालं. 

मनारा आणि मुनव्वरचा हॅशटॅगही सोशल मीडियावर सुरु झाला आहे. लोकांना या दोघांची मैत्री फार आवडली होती. मात्र शोच्या शेवटच्या दिवसात या दोघांमध्ये इतका वाद झाला होता की, अनेकदा या दोघांमध्ये खूप मोठं भांडणंही झालं होतं. मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा मनारा आणि मुनव्वरची भेट झाली आहे,

अभिषेकच्या पार्टीत बिग बॉसच्या कंटेस्टंट्सच रीयूनियन
६ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री 'बिग बॉस 17'चा फर्स्ट रनरअप ठरलेला अभिषेक कुमारने एका सुंदर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत नाविद सोले, आयशा खान , सोनिया बंसल, रिंकू धवन, मुनव्वर फारूकी, मनारा चोपड़ा, अंकित गुप्ता, प्रियंका चाहर सोबत अनेक बिग बॉसचे एक्स कंटेस्टेंट्स या पार्टित सहभागी झाले होते.

मुनव्वरने घेतली मनाराची शाळा
'बिग बॉस 17'नंतर मुनव्वर फारूकी और मनारा चोपडाची पहिल्यांदाच भेट झाली. दोघंही अभिनषेकने होस्ट केलेल्या पार्टीत भेटले. यानंतर या दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि मीडियासोबत बोलताना या दरम्यान कॉमेडियनने मनाराची खिल्ली उडवली. त्याने मनाराची खिल्ली उडवत म्हटलं की, इथे दोन विनर आहे. यानंतर तो हसू लागला. पुढे अभिषेकही मनाराची खिल्ली उडवत म्हणतो की, "NRI कॅटेगरीमध्ये नाविद विनर आहे."
 
अभिषेक आणि मुनव्वर यांच्या या वक्तव्यावर आधी मनारा खूप हसते मात्र नंतर ती नाराज होते. पुढे ती मुन्नवर निशाणा साधत म्हणते, आणि हा कोणत्या कॅटेगरमध्ये विनर आहे? यावंर मुनव्वर उत्तर देत म्हणतो की, मी विनर कॅटेगरीमध्ये आहे. यानंतर ती त्याला शुभेच्छा देते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'बिग बॉस 17'ची सेकंड रनर-अप ठरलेल्या मनारा चोपडाने इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये लिहीलं होतं की, ती फिमेल कॅटेगरीमध्ये विनर आहे. यानंतर मुनव्वरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मनाराची खिल्ली उडवली होती. तो म्हणाला की, अंकिता आणि विक्की कपल कॅटेगरीमध्ये विनर आहेत.  नाविद NRI कॅटेगरीमध्ये आणि औरा इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये विनर आहे.