रिलेशनशिप ठरली बबितासाठी घातक, एक्स बॉयफ्रेन्डचं नाव ऐकून व्हाल थक्क

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बबिताचं करियर अभिनेत्यामुळे उध्वस्त  

Updated: Nov 18, 2021, 03:30 PM IST
रिलेशनशिप ठरली बबितासाठी घातक, एक्स बॉयफ्रेन्डचं नाव ऐकून व्हाल थक्क title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्ट चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा  निर्माण केली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका टप्पू सेना आणि गोकूळधाम सोसायटीमधील एकतेमुळे लोकप्रिय आहे. तर दुसरीकडे जेठालाल आणि बबिता जीमुळे मालिका चर्चेत असते. बबिताने तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे आणि बोल्ड अदांमुळे ओळखली जाते. बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता मालिकेमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि वादांमुळे चर्चेत असते.

याआधी मुनमुन दत्ता एका व्हिडिओमुळे वादात अडकली होती. अभिनेता अरमान कोहलीसोबतच्या नात्यामुळेही ती चर्चेत होती. मुनमुन दत्ता अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं होतं. पण, त्यांच्यासाठी या नात्यात राहणे इतके सोपे नव्हते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Kohli (@armaankohliofficial)

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांमध्ये इतका गोंधळ झाला की, दोघांच्या नात्याचे सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अरमान कोहलीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मुनमुन दत्तावर हात उगारला तेव्हा चर्चेला उधाण आलं होतं.

डीएनएला रिपोर्टनुसार, मुनमुनचं नाव अरमान कोहलीसोत जोडण्यात आलं. त्यांच्या रिलेशनशिपची सुरूवात 2008 साली झाली. पण मुनमुनसाठी हे नातं फार भयंकर ठरलं.  नात्याला सुरूवात झाली आणि अरमानने मुनमुनला मारहाण करण्यासं सुरूवात केली. मुनमुन दत्ता या घटनेमुळे खूप संतापली आणि मग तिने पोलिसांकडे अरमानची तक्रार दाखल केली. 

प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि नंतर अरमान कोहलीला अभिनेत्रीची माफी मागावी लागली. याशिवाय त्याला दंडही भरावा लागला. मात्र, अरमान कोहलीचा आक्रमक रुप समोर येण्याची ही पहिलीच घटना नव्हती. बिग बॉस 7 मध्येही तो त्याच्या रागाच्या स्वभावामुळे खूप चर्चेत होता.