हे माँ माताजी, अय्यरची बबिता चिखलाने माखली

'तारक मेहता का उल्टा चश्म' या कार्यक्रमातील सगळी पात्रं चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहेत. 

Updated: Jul 17, 2021, 10:51 PM IST
हे माँ माताजी, अय्यरची बबिता चिखलाने माखली title=

मुंबई : सगळ्यात प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्म' या कार्यक्रमातील सगळी पात्रं चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहेत. त्या कलाकारांपैकी एक म्हणजे मुनमुन दत्ता, जी या शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारत आहे. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि तिच्या फोटोंद्वारे व व्हिडिओंद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करते. बबीताने पुन्हा तिचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती चिखलाने अंघोळ करताना दिसत आहे. मुनमुन दत्ता ऊर्फ बबीताचे  हे फोटो 4 वर्ष पूर्वीचे आहेत, परंतु तिने हे  फोटो पुन्हा शेअर केले आहेत.

मुनमुन दत्ताने केलं मड बाथ
'तारक मेहता का उल्टा चश्म'च्या बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर ही फोटो शेअर केले आहेत. समुद्राशेजारी ती चिखलाने भिजलेली दिसत असल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. मुनमुन दत्ताचा हा फोटो वर्ष  2017चा आहे आणि त्यावेळी ती सुट्टीवर जॉर्डनला गेली होती. त्या काळात तिने मड बाथ घेतला होता. मुनून दत्ता समुद्रासमोर उभी आहे, त्याला डेड सी असं म्हणतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जॉर्डनमध्ये घेतला मड बाथ
बबीता जी म्हणजे मुनमुन दत्ताने या फोटोंच्या कमेंन्टमध्ये लिहिलं आहे की, 'डेड सी आणि मड बाथ. जॉर्डन 2017. ' मुनमुन दत्ताच्या या फोटोवर चाहते कमेंन्टचा वर्षाव करत आहेत. या फोटोंवर ४लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. नुकताच अभिनेत्री उर्वर्शी रौतेलाने देखील मडबाथ घेतला होता याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुनमुन दत्ताचं करिअर
२००४साली 'हम सब बराती' या मालिकेतून मुनमुन दत्ताने टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर  2008 मध्ये ती 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत बबीताजीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेमुळे तिला इतकी लोकप्रियता मिळाली आहे की, ती आता बबिता जी म्हणून ओळखली जात आहे. टेलिव्हिजन व्यतिरिक्त तिने चित्रपटांमध्येही आपला हात आजमावला आहे. मुनमुन दत्ताने 'मुंबई एक्स्प्रेस', 'हॉलिडे' आणि 'ढिंचॅक एंटरप्राइज' यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनयाची कौशल्ये दाखविली आहेत.