'मुन्ना मायकल'नं नवाझुद्दीनलाही शिकवल्या डान्सिंग स्टेप्स!

हिरोपन्ती, बागी आणि आता मुन्ना मायकल...डान्सिंगस्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा आपला एक्शन पॅक्ड धमाका बिग स्क्रीनवर दाखवण्यासाठी सज्ज झालाय. मुन्ना मायकलमध्ये टायगरने नवाजुद्दीनलाही डान्सिंग स्टेप्स शिकवल्यात.

Updated: Jun 9, 2017, 11:33 PM IST
'मुन्ना मायकल'नं नवाझुद्दीनलाही शिकवल्या डान्सिंग स्टेप्स! title=

प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : हिरोपन्ती, बागी आणि आता मुन्ना मायकल...डान्सिंगस्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा आपला एक्शन पॅक्ड धमाका बिग स्क्रीनवर दाखवण्यासाठी सज्ज झालाय. मुन्ना मायकलमध्ये टायगरने नवाजुद्दीनलाही डान्सिंग स्टेप्स शिकवल्यात.

जॅकी पुत्तर टायगर श्रॉफ त्याच्या धमाकेदार डान्सिंग स्टेप्ससाठी  प्रसिद्ध आहे. टायगरची ही क्रेझ कॉलेजियन्समध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे आणि म्हणूनच फिल्ममेकर्सही त्याला त्याच रोलमध्ये पडद्यावर आणण्यास आतूर असतात. आगामी मुन्ना मायकल या फिल्ममध्ये टायगरचा हाच डान्सिंग अवतार पहायला मिळणार आहे.

टायगर श्रॉफ, निधी अगरवाल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अशी स्टारकास्ट या फिल्ममधून पहायला मिळणार आहे. आता नवाजुद्दीनच्या आतापर्यंतच्या फिल्म पाहता नवाजुद्दीनला डान्स करताना फारसं कुणी पाहिलेलं नाही. मुन्ना मायकलमध्ये मात्र नवाजुद्दीन ठुमके लगावताना दिसणार आहे. यासाठी नवाजुद्दीनला डान्सिंग स्टेप्स शिकवण्याची जबाबदारी घेतली होती टायगरने... नवाजुद्दीनला डान्सिंग स्टेप्स शिकवणं किती कठीण गेलं असं जेव्हा टायगरला विचारलं तेव्हा टायगरचं उत्तर हे असं होतं...

निधी अगरवाल या फिल्ममधून बॉलिवूड एन्ट्री करतीय. निधीने आणि नवाजुद्दीनने टायगरच्या डान्सवेडाचं भरभरून कौतुक केलंय. एकूणच अॅक्शन डान्स या नव्या फॉर्ममध्ये ही नवी फिल्म क्रेझी फॅन्ससाठी बनवण्यात आलीये. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना आता ती कशी वाटतेय याचीच उत्सुकता आहे.