'नागिन ३'मध्ये करिष्मा बनणार 'नागिन'

निर्माती एकता कपूरने सोमवारी आपल्या नवी सिरियल 'नागिन ३' मध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या नावाचा खुलासा केलायं.

Updated: Apr 9, 2018, 07:05 PM IST
'नागिन ३'मध्ये करिष्मा बनणार 'नागिन' title=

मुंबई : निर्माती एकता कपूरने सोमवारी आपल्या नवी सिरियल 'नागिन ३' मध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या नावाचा खुलासा केलायं.

 

Here comes the first NAAGIN ! @karishmaktanna welcome to NAAGIN 3! Coming sooon on @colorstv @rajcheerfull

A post shared by Ekta Ravi Kapoor (@ektaravikapoor) on

  सिरियलमध्ये करिश्मा 'नागिन' चं कॅरेक्टर करणार असल्याचे यावेळी सांगितलं. एकताने सोशल मीडियावर पोस्ट करून शोमध्ये अभिनेत्रीचं स्वागत केलयं  ''ही आहे पहिली नागिन. करिश्मा तन्ना, 'नागिन ३' मध्ये स्वागत. लवकरच येतोय कलर्सवर''. तिने करिश्माच्या कॅरेक्टरच फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केलय. 'नागिन ३' मध्ये तीन नागिन असणार अशी चर्चा आहे. पण इतर २ अभिनेत्रींची नावं पुढे आली नाहीत. सिरियलच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात नागिनचे कॅरेक्टर मौनी रायने केलं होतं.