वय फक्त आकडा... वयाच्या 71 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं काम पाहून तुम्हीही म्हणाल..

नाना पाटेकरांनी दाखवून दिलं कोणत्याही कामासाठी जिद्द महत्त्वाची आणि वय फक्त आकडा...   

Updated: Oct 6, 2022, 01:11 PM IST
वय फक्त आकडा... वयाच्या 71 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं काम पाहून तुम्हीही म्हणाल.. title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांना आपल्या अभिनयाने सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सिनेमा हिंदी असो किंवा मराठी नाना पाटेकर (nana patekar) यांचा अभिनय नेहमीच लक्षात ठेवण्यासारखा असतो. त्यांनी आतापर्यंत बरेच हीट सिनेमे दिले आहेत. त्यांचं अभिनय कौशल्य आणि डायलॉगवर असलेली पकड सिनेमांमध्ये कायम दिसून येते. पण आता नाना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.  सध्या नाना उत्तराखंडमध्ये (kedarnath) सिनेमाचं शूटिंग करत असून शुटिंग दरम्यान त्यांनी केलेलं काम सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

नाना पाटेकर यांनी वयाच्या 71 व्या वर्षी डोंगर चढून एक पराक्रम केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपट निर्माते विपुल मेहताही (nana patekar kedarnath yatra) होते. दिग्दर्शकाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये दोघे डोंगर चढताना दिसत आहेत. 

व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'केदारनाथमध्ये शुटिंग... आम्ही भैरवनाथ चढलो आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत शुटिंग करण्यासाठी आलो आहोत...' असं लिहिलं आहे. सध्या दिग्शकांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (nana patekar net worth)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वयाच्या 71 व्या (nana patekar age) वर्षी नाना पाटेकर तंदुरुस्त असल्याचं देखील दिग्दर्शकांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, नाना पाटेकर बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही सिनेमात दिसले नाहीत. त्यामुळे नानांचे चाहते त्यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.