'तिच चांगली सून', आलिया नव्हे, कोणाची प्रशंसा करताहेत नीतू कपूर? लेकाच्या लग्नानंतर होतोय पश्चाताप?

'तिच चांगली सून...', नीतू कपूर यांना लेकाच्या लग्नानंतर होतोय पश्चाताप?  

Updated: Jun 21, 2022, 03:15 PM IST
'तिच चांगली सून', आलिया नव्हे, कोणाची प्रशंसा करताहेत नीतू कपूर? लेकाच्या लग्नानंतर होतोय पश्चाताप? title=

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा कायम रंगत असतात. अभीनेत्री नीतू कपूर देखील लेक आणि मुलाबद्दल बोलताना दिसतात. नीतू पुन्हा एकदा सूनेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नीतू यांनी उत्तम सून म्हणून आलियाचं नाही, तर अभिनेत्री किआरा आडवाणीचं कौतुक केलं आहे. 'भविष्यात किआरा उत्तम सून होऊ शकते...' असं नीतू म्हणाल्या. 

नीतू कपूर सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत. नीतू यांचा ‘जुग-जुग जियो’(Jug Jug Jeeyo) सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात किआरा आणि नीतू सासू-सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

एका मुलाखतीत नीतू यांनी कियाराचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, 'कियारा खूप चांगली आहे आणि भविष्यात ती उत्तम पत्नी होईल, ती खूप गोड आणि सुंदर आहे.' यावेळी नीतू यांनी लग्नाबद्दल स्वतःचं मत मांडलं. 

लग्नांबद्दल बोलताना नीतू कपूर म्हणाल्या, 'कोणत्याही नात्यात संयम बाळगला पाहिजे, कारण दोन व्यक्ती सारख्या असू शकत नाहीत. प्रत्येकाच्या स्वतःच्या समस्या असतात. तुम्ही एकमेकांना समजून घ्यायला हवं, ज्यामुळे तुमच नातं टिकेल.'

'वैवाहिक जीवन चांगले होण्यासाठी अनेक तडजोडी आणि त्याग करावा लागतो. आजची पिढी तडजोडीसाठी तयार होत नाही. याच कारणामुळे ब्रेकअप आणि घटस्फोटाची संख्या वाढली आहे. कोणतही नात दिर्घ काळ टिकण्यासाठी विश्वास फार महत्त्वाचा आहे. असं देखील नीतू म्हणाल्या.