आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

रणबीर कपूर ब्रह्मास्त्र चित्रपटातील लुक टेस्टचा हा फोटो आहे. 

Updated: Oct 9, 2022, 10:08 PM IST
आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...  title=

Ranbir Kapor Shirtless Photo: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या आपल्या ब्रह्मास्त्र (Bramhastra) या चित्रपटामुळे जास्त चर्चेत आले आहेत. त्यातून आलियाच्या प्रेग्नंन्सीमुळे रणबीरही आपल्या मनातला आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतो आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असणारा रणबीर कपूर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Ranbir Kapoor Viral Photos) त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. (neetu kapoor shares ranbir kapoor shirtless photo goes viral on social media)

नीतू कपूर यांनी स्वतःहून रणबीर कपूरचे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. (Neetu Kapoor Instagram) या शर्टलेस फोटोमध्ये रणबीर आपले सिक्स पॅक्स फ्लॉन्ट करताना दिसतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा फोटो रणबीरच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या फर्स्ट लुकचा आहे. रणबीर कपूर ब्रह्मास्त्र चित्रपटातील लुक टेस्टचा हा फोटो आहे. 

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

हा फोटो सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोतला रणबीरचा ग्लॅमरस लुक पाहून चाहतेही रणबीरच्या प्रेमात पडले आहे. तर अनेक महिला फॅन्सही रणबीरच्या या लुकनं घायाळ झाल्या आहेत. सध्या या फोटोंना नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर काही जण त्याच्या या शर्टलेस फोटोवरून ट्रोलही करत आहेत. 

रणबीर कपूर देखील नीतू कपूरसोबत त्याच्या शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डान्स दिवाने ज्युनियर्सच्या (Dance Deewane Juniors) सेटवर आला होता. तेव्हा त्यांनी एकत्र केलेला डान्स सगळीकडे व्हायरल झाला होता. हे व्हिडीओही नीतू कपूर यांनी शमशेराच्या प्रमोशनच्या निमित्तानं शेअर केले होते. (Shamshera Movie)

नीतू कपूर यांचा अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत जुगजग जीयो (Jug Jug Jeeyo) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र (Bramhastra) या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन देखील होते. रणबीर कपूर लवकरच अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. (Animal)