Rishi Kapoor यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगताना भावुक झाल्या नितू कपूर

ज्या दिवशी शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलं, त्याचं दिवशी सोडली साथ... ऋषी कपूर यांच्या शेवटच्या क्षणाची आठवण...  

Updated: May 8, 2022, 12:03 PM IST
Rishi Kapoor यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगताना भावुक झाल्या नितू कपूर  title=

मुंबई : तो एक दिवस आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला... कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली... तो दिवस म्हणजे अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा घेतलेला निरोप . आज ऋषी आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि अभिनय कधीही विसरता येणार नाही. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नितू कपूर कायम पतीच्या आठवणी सांगत असतात. आता त्यांनी ऋषी कपूर यांच्या शेवटच्या क्षणांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. 

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, '13 एप्रिल 2020 चा तो दिवस होता, ज्या दिवशी आमचं शेवटचं बोलणं झालं... कारण त्यानंतर ऋषी यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं.... ' एक काळजाचा ठोका चुकवणारी गोष्ट म्हणजे, 13 एप्रिल 1979 साली ऋषी आणि नितू यांचा साखरपुडा झाला होता. 

नितू पुढे म्हणाल्या, 'शेवटच्या क्षणी ऋषी फार त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि ते सगळं डोळ्यांनी पाहाणं माझ्यासाठी फार कठीण होतं. त्यांना खूप काही बोलायचं होतं, पण ते भावना व्यक्त करू शकले नाहीत....' याचं गोष्टीचं खंत नितू यांना आजही जाणवते.

नितू कपूर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच 'जुग जुग जिओ' या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात नितू कपूरशिवाय वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

 'जुग जुग जिओ'  सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय नीतू कपूर डान्स दिवाने ज्युनिअरला जज करताना दिसत आहे.