मराठमोळ्या बोल्ड अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख ठरली

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री 

Updated: Dec 1, 2019, 08:48 AM IST
मराठमोळ्या बोल्ड अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख ठरली  title=

मुंबई : तुळशीच्या लग्नानंतर सगळीकडे लगीनघाई पाहायला मिळते. हीच लगीनघाई आता मराठी सिनेसृष्टीतही पाहायला मिळणार नाही. मराठमोळी बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नाची तारीख ठरली आहे. सगळीकडे याचीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी नेहाने आपल्या बॉयफ्रेंडची ओळख करून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. 

काही दिवसांपूर्वीच नेहाने आपल्या बॉयफ्रेंड शार्दुल सिंग बयाससह फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. शार्दुलचा ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंध नसून तो व्यावसायिक असल्याचं देखील तिने सांगितलं. नेहाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचे फोटो शेअर केले होते. यानंतर चाहत्यांकडून लग्न कधी करणार अशी विचारणा होत होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली आहे. 5 जानेवारी 2020 रोजी नेहा विवाहबंधनात अडकणार आहे. नेहाचे लग्न पुण्यात होणार असून अगदी खासगी पद्धतीने हा सोहळा होणार आहे. यावेळी नेहाचा जवळचा मित्र-परिवार आणि कुटुंबातील व्यक्ती उपस्थित असणार आहेत. 

नेहाने नुकताच 29 नोव्हेंबर रोजी आपला 35 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच नेहाने बॉलिवूड लाइफला या वेबसाइटला आपल्या लग्नाची तारीख सांगितली. शार्दुल आणि नेहाचा साखरपुडा अगदी खासगी पद्धतीने झाल्याचं सांगितलं जातंय. तसेच शार्दुलने 1 जुलै रोजी Happily Engaged असं कॅप्शन टाकंत फोटो शेअर केला होता. नेहावर आता सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुण्यात पार पडणाऱ्या या सोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.