प्रेमात उद्ध्वस्त झालेला सिद्धार्थ म्हणतो 'तुम ही आना...'

'मरजावां' चित्रपटातील 'तुम ही आना' प्रदर्शित 

Updated: Oct 3, 2019, 04:09 PM IST
प्रेमात उद्ध्वस्त झालेला सिद्धार्थ म्हणतो 'तुम ही आना...' title=

मुंबई : प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला जगायला शिकवते. पण हेच प्रेम आपल्यापासून कायमचं दूर झाल्यावर होणारा त्रास फार वेदनादायी असतो. 'तेरे जाने का गम और ना आने का गम....' प्रेम विरहं व्यक्त करणारं हे गाणं 'मरजावा' चित्रपटातील आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया या दोन प्रेमी युगूलांवर चित्रीत करण्यात आला आहे. 'मरजावां' चित्रपटातील 'तुम ही आना' प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

खुद्द ताराने तिच्या सोशल मीडिया आकाउंटवर हे गाणं पोस्ट केलं. काहीदिवसांपूर्वी एकापेक्षा एक डायलॉगने सजलेल्या 'मरजावां' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख, अभिनेत्री तारा सुतारिया चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची कथा दोन प्रेमी युगूलांच्या भोवती फिरताना दिसत आहे.  

'मरजावां' चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केलं आहे. तर निर्मिती भूषण कुमार,निखिल अडवाणी, दिव्या खोसला-कुमार, कृष्णा कुमार यांनी केली आहे.